Friday, July 5, 2024

सेटवरून ‘भाईजान’च्या आगामी चित्रपटाचा लूक झाला लीक; लांब केस अन् दाढीमध्ये त्याला ओळखणेही झाले कठीण

सलमान खान त्याच्या दमदार आणि प्रभावशाली अभिनयाने कायमच चर्चेत असतो. तो आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याचे चाहते त्याच्या सर्व पोस्टला चांगलीच पसंती देतात. ‘भाईजान’ म्हणून ओळखला जाणारा हा अभिनेता आता लवकरच ‘टायगर ३’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या चाहत्यांना त्याच्या या चित्रपटाची खूप दिवसांपासून उत्सुकता लागली आहे.

त्यांच्या उत्सुकतेला आता कुठेतरी समाधान मिळणार आहे कारण, सलमान खानचा ‘टायगर ३’ या चित्रपटातील सेट वरचा एक फोटो व्हायरल झाला आहे. (salman khan first look from tiger 3 russia set viral on social media)

सलमान आणि कॅटरीना रुस येथील सेंट पीटर्सबर्गमध्ये शुक्रवारी ‘टायगर ३’ चित्रपटाचे शूटिंग करत होते. सलमानचा हा लूक आता पर्यंतच्या चित्रपटांपेक्षा फार वेगळा आहे. तो या लूकमध्ये ओळखून सुद्धा येत नाही. त्याने यामध्ये ब्राऊन रंगाची दाढी व लांब केस ठेवले आहेत. अंगावर लाल रंगाचा जॅकेट आणि सफेद टीशर्ट परिधान केले आहे. तसेच डोक्याला लाल रिबीन बांधली आहे. त्याचा हा लूक तूफान व्हायरल होत आहे. तसेच त्याच्या या लूकवर चाहत्यांच्या भरघोस कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
त्याच्या चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “एक नंबर लूक केला आहे भाई जान. असं वाटतं आहे की, भाईची २०२२ ची ईद धमाकेदार होणार.”

https://www.instagram.com/p/CS1-5fwsJ-Y/?utm_source=ig_web_copy_link

टायगर फ्रॅंचायजीचा ‘टायगर ३’ हा तिसरा चित्रपट आहे. या आधी ‘टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. त्यामुळे आता ‘टायगर 3’ हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका करणार असं वाटत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम अक्षरा सिंगचं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज

-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’नंंतर आता कंगना रणौतचा ‘थलायवी’ देखील होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

हे देखील वाचा