बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हे नावच खरं तर खूप काही बोलून जातं. या एका नावाशी अनेक नावं आणि अनेक कार्ये जोडली गेली आहेत.
सलमानविरोधात आज कोर्टात खटले दाखल झालेले असले, सलमान रागिष्ट आहे असं सगळ्यांना माहीत असलं, तरीही तो मुळात किती प्रेमळ आणि मदतीला धावून येणार दोस्त आहे. हे त्याच्यासोबत वावरणाऱ्या लोकांनाच माहीत असत.
त्याच्या कक्षेबाहेरील कुठल्याच व्यक्तीला त्याची वैयक्तिक माहिती माहीत नसते. असंच सलमानने एकदा गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह यांची मदत केली होती.

कश्मीरा शाह टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनयासोबतच तिच्या जबरदस्त नृत्यासाठीही ओळखली जाते. अलीकडेच कश्मीरा बिग बॉस १४ मध्ये अल्पावधीसाठी दिसली होती, मात्र अल्पावधीतच ती प्रेक्षकांच्या आकर्षणाचं केंद्र बनली होती. इतकंच नाही तर कश्मीरा आपल्या बोल्ड फोटोशूटबाबतही नेहमी चर्चेत असते. तिचे हे फोटोज स्वतः तिचा नवरा कृष्णा अभिषेकने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
कश्मीरा तिचा नवरा कृष्णावर खूप प्रेम करते, परंतु या जोडप्याने वैयक्तिक आयुष्यात सुरुवातीच्या काळात खूप त्रास भोगला आहे. मात्र, त्यावेळी पावलोपावली सलमान खानने त्याला खूप मदत केली.

कश्मीरा इंडस्ट्रीतील एक सुप्रसिद्ध नाव आहे, परंतु ती बर्याचदा आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत राहते. कृष्णा अभिषेक हा कश्मीराचा दुसरा पती आहे. या दोघांचे २०१३ साली लग्न झाले होते. ‘पप्पू पास हो गया’ चित्रपटाच्या सेटवर कश्मीरा आणि कृष्णाच्या प्रेमाची सुरूवात झाली. शूटिंगनंतरही दोघेही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसायचे.
कृष्णापूर्वी कश्मीराने ब्रॅड लिस्टरमॅनशी लग्न केलं होतं पण २००७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर, ती कृष्णाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. २०१३ मध्ये कृष्णा आणि कश्मीराचं लग्न झालं होतं, परंतु बर्याच दिवसांपासून या दोघांनी आपले संबंध जगापासून लपवून ठेवले. परंतु, काही काळानंतर कृष्णा आणि कश्मीरा यांनी आपला विवाह झाला असल्याचं जगाला सांगितलं.

लग्नानंतर बाळाला जन्म देताना कश्मीरा आणि कृष्णाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. कश्मीराच्या म्हणण्यानुसार, नैसर्गिक मार्गाने गर्भवती होता येत नसल्यामुळे त्यांनी आयव्हीएफचा देखील सहारा घेतला होता. परंतु, कृष्णा आणि कश्मीरा यांनी केलेला हा प्रयत्नही अयशस्वी ठरला होता. त्यावेळी सलमान खानच्या एका सल्ल्याने कश्मीराला खूप मदत झाली.

काश्मिराने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘तिने गर्भवती होण्यासाठी १४ वेळा अयशस्वी प्रयत्न केला होता. यानंतर सलमान खानने तिला सरोगसीचा सल्ला दिला, जो त्यांच्यासाठी प्रभावी ठरला. कृष्णा आणि कश्मीरा यांनी पुन्हा सरोगसीचा अवलंब केला आणि २०१७ मध्ये त्यांची जुळी मुलं जन्माला आली. सलमानच्या या सल्ल्याबद्दल कश्मीरा नेहमीच त्याचे आभार मानते.’ असे काश्मिराने म्हटले होते.