Friday, July 5, 2024

जेव्हा गुलशन ग्रोव्हरला सलमान खानने स्वस्त घड्याळावरून चिडवल्यावर बॅडमॅनने दिले होते ‘हे’ उत्तर

प्रत्येक कलाकाराला त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात संघर्ष करावाच लागतो. या काळात हे कलाकार अनेक संकटांचा, समस्यांचा सामना करत असतात. पैशाची कमतरता असल्यामुळे कलाकारांना सध्या वस्तू देखील वापराव्या लागतात. बॉलिवूडमध्ये पाहिले तर हे दिखाव्याचे जग आहे. झगमगाट, पैशाची उधळपट्टी, ब्रँडेड वस्तू आदी चैनीच्या गोष्टींची इथे चलती असते. या क्षेत्रात कामासाठी संघर्ष करणारे अनेक कलाकार पैसा जास्त नसल्यामुळे स्वस्त आणि ब्रँड नसलेल्या वस्तू वापरताना दिसतात. एखादा कलाकार सध्या वस्तू वापरत असल्याचे दुसऱ्याला समजले त तो त्याची नक्कीच खिल्ली उडवतो. याचाच अनुभव इंडस्ट्रीमधील बॅडमॅन असलेल्या गुलशन ग्रोव्हर यांनी देखील घेतला आहे. आज गुलशन ग्रोव्हर बॉलिवूडमधील मोठे नाव आहे. त्यांच्याकडे नाव, पैसा, प्रसिद्धी सर्वच आहे, मात्र त्यांच्या सुरुवातीच्या काळात गुलशन यांना मोठा संघर्ष करावा लागला होता. नुकतेच गुलशन ग्रोव्हर (Gulshan Grover) हे त्यांच्या आगामी ‘योर ऑनर’ या वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये (The Kapil Sharma Show) पोहचले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या संघर्षाच्या दिवसांना उजाळा देत एक सलमान खानशी (Salman Khan) संबंधित किस्सा देखील सांगितला.

गुलशन यांनी एकदा त्यांच्या सुरुवातीच्या काळात एक साधी आणि स्वस्त मनगटावरील घड्याळ विकत घेतले. तेव्हा ते कामासाठी खूप संघर्ष देखील करत होते. त्यांनी घड्याळ घेतले, मात्र ते स्वस्त आणि ब्रँडेड नसल्याचे कोणालाही नाही सांगितले. मात्र बोलता बोलता त्यांनी ही गोष्ट सलमान खानला सांगितली. त्यानंतर सलमान खान त्याला जेव्हा जेव्हा भेटत होता तेव्हा तेव्हा तो त्यांना किती वाजले विचारायचा. त्याने असे विचारल्यावर स्वतःच त्याच्यावर हसायचा. ही गोष्ट खूप वेळेस घडली. त्यानंतर एकदा सलमानच्या या प्रश्नावर गुलशन म्हणाले की, “वेळ विचारायची एवढी हौस आहे, तर तू पण एक घड्याळ विकत घे.”

हा किस्सा ऐकल्यानंतर शोमध्ये उपस्थित सर्वच जणं हैराण झाले नंतर जोरजोरात हसू लागले. सलमान आणि गुलशन ग्रोव्हर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र देखील आहेत. या शोमध्ये गुलशन यांनी अजून एक किस्सा सांगितला आणि तो म्हणजे एका सिनेमात त्यांनी शाहरुखला मारले होते, आणि त्याची लोकप्रियता जगात एवढी होती की, एकदा त्यांना मोरोक्कोला जायचे होते, केवळ शाहरुख खानला मारल्यामुळे त्यांचा व्हिजा रिजेक्ट झाला होता.

हेही वाचा-

हे देखील वाचा