कोरोना व्हायरसचा प्रभाव दिवसेंदिवस पाहायला मिळतोय. या व्हायरसपासून कोणीही वाचू शकलेले नाही. सामान्य व्यक्तीपासून ते बॉलीवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांपर्यंत सर्वांना या व्हायरसचा फटका बसला आहे. अशातच आता बॉलीवूडचा दबंग म्हणजेच सुपरस्टार सलमान खाननेही या व्हायरसपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी स्वत:ला आयसोलेट केले आहे. तरीही, सलमान स्वत: कोरोना पॉझिटिव्ह नाही. परंतु त्याच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांपैकी २ जण या व्हायरसच्या कचाट्यात सापडले आहेत.
खरं तर सलमान खानच्या ड्रायव्हरसह दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सलमानने स्वत:च्या सुरक्षेसाठी स्वत:ला आयसोलेट केले आहे. तो सध्या त्याच्या कामामध्ये खूप व्यस्त आहे. अशामध्ये त्याने स्वत:ला आयसोलेट केल्याने त्याचा प्रभाव त्याच्या कामावरही पडताना दिसणार आहे.
सध्या सलमान खान टीव्हीवरील सर्वात चर्चेत असलेल्या ‘बिग बॉस १४’चा हंगाम होस्ट करत आहे. याव्यतिरिक्त सलमान आपल्या येत्या ‘राधे: युवर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाची शूटिंगही करत होता. या दोन्ही ठिकाणी सलमानच्या आयसोलेट होण्याचा प्रभाव पडू शकतो. आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल की, सलमान बिग बॉस १४ च्या पुढील एपिसोडमध्ये दिसेल की नाही.
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातला आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यामुळे अनेक महिने सर्व चित्रपटांच्या शूटिंग बंद होत्या. त्यानंतर आता अनलॉक झाल्यामुळे चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार पुन्हा एकदा होताना दिसत आहे.
यापूर्वीही बॉलीवूडच्या अनेक प्रसिद्ध कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, आराध्या बच्चन या बच्चन कुटुंबाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त किरण कुमार, हिमानी शिवपुरी, करीम मोरानी आणि तिच्या दोन्ही मुलींनाही कोरोनाची लागण झाली होती.
वाचा- ‘सायकलने जाणार की रिक्षाने’, मालदीवला पाठव म्हणणाऱ्या युझरला सोनू सूदचे मजेशीर प्रत्युत्तर