Tuesday, June 25, 2024

बडे दिलवाला! मोठी सुरक्षा भेदून सलमान खानने मारली त्याच्या छोट्या फॅनला मिठी, व्हिडिओ व्हायरल

बाॅलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान ( Salman Khan) सतत चर्चेत असतो. कधी चित्रपटामुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात येत असतो. बॉलीवूडचा भाईजान हा सगळ्यांचा आवडता आहे. मग ते लहान मुले असोत वा प्रौढ, सर्वांनाच तो खूप आवडतो. त्याचप्रमाणे सलमान खानही त्याच्या चाहत्यांवर खूप प्रेम करतो. अशात सलमान खानचा एक व्हिडिओ ( Salman Khan Video) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सलमान खान त्याच्या नव्या लूकमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहतो. गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला सतत धमक्यां देण्यात येत होत्या. त्यामुळे सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सलमान जिथे जातो तिथे त्याच्यासोबत त्याचे अंगरक्षक असतात. सलमानचा अंगरक्षक शेरा कोणालाही सलमानच्या जवळ येऊन देत नाही. मात्र सध्या एक वेगळच चित्र समोर आले आहे. विरल भयानी यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अलीकडेच सलमान मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) त्याच्या लेटेस्ट लूकमध्ये दिसला. त्यांच्यासोबत विमानतळावर अनेक सुरक्षा रक्षक होते, जे त्याला काटेकोरपणे सुरक्षा देण्याचे काम करत होते. मात्र, सलमान पुढे येताच सलमान खानचा एक छोटा चाहता त्याच्याकडे धावत आला. हा मुलगा अशा प्रकारे धावत आला की, सगळे एकटक त्याच्याकडे बघतच राहिले. त्याने धावत जाऊन सलमान खानला मिठी मारली. यावेळी मुलाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सलमान देखील खूप आनंदी झाला.

त्यावेळी सलमानने लहान मुलाला मिठी मारत छान स्माईल दिली. यावेळी सलमानचा अंगरक्षक शेरा देखील हे सर्व पाहत राहिला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. या व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सलमानने दिलेेली ही प्रतिक्रीया पाहूण चाहतेही त्याच्यावर फिदा झाले आहेत. चाहते या व्हिडीओवर एका पेक्षा एक भन्नाट कमेंट करत आहेत. (Salman Khan is emotional after seeing the fan’s behavior at the airport)

हे देखील वाचा