Wednesday, June 26, 2024

‘दबंग खान’ची टेस्ट! कपिल शर्माने सलमानला विचारली कॅटरिनाच्या ६ बहिणींची नावे; पाहा पुढे काय झालं

‘सलमान खान’ आणि ‘कॅटरिना कैफ’ हे दोघेही अत्यंत लोकप्रिय कलाकार आहेत. या दोघांनाही ऑनस्क्रिन पाहायला प्रेक्षकांना फारच आवडतं. कॅटरिना आणि सलमानने अनेक चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे. त्यांची जोडी देखील चाहत्यांना आवडते. बघायला गेलं तर एकेकाळी ही जोडी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील बऱ्याच काळासाठी एकमेकांसोबत होती. परंतु काही दिवसांनंतर ते एकमेकांपासून वेगळे झाले.

जरी सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांचं ब्रेकअप झालं होतं, तरी त्यांच्या मैत्रीला त्या गोष्टीचा अजिबात धक्का नाही लागला. त्यानंतरही एक मित्र म्हणून ते नेहमी एकमेकांसोबत असायचे. एकमेकांना सपोर्ट करायचे. त्यानंतरही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे. तसेच ते सिनेमे हीट देखील झाले आहेत. दोघे जरी त्यांच्या रिलेशनमधून बाहेर पडले असले, तरी त्यांनी त्याचा कोणताही परिणाम त्यांच्या कामावर होऊ दिला नाही.

त्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक 2019 मध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा ‘भारत’ यात सलमान आणि कॅटरिना यांनी ब्रेकअपनंतर काम केलं होतं. त्या चित्रपटातील त्यांच्या जोडीला चाहत्यांकडून खूप पसंती देखील मिळाली होती.

जेव्हा ‘भारत’ या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी सलमान खान आणि कॅटरिना कैफ हे दोघेही ‘द कपिल शर्मा’ शो मध्ये आले होते, तेव्हा प्रेक्षकांना त्या दोघांमधील केमिस्ट्री खूपच आवडली. त्यावेळी कपिल शर्मा याने सलमानला कॅटरिनाच पूर्ण नाव विचारलं होतं आणि सलमानने त्याचं बरोबर उत्तर दिलं होत.

कॅटरिनाचं खरं नाव ‘कटरिना टरक्योट’ हे आहे. याव्यतिरिक्त कपिलने सलमान खानला विचारले की, कॅटरिनाला किती भाऊ बहीण आहेत?

खरंतर सलमान पहिल्याच टेस्टमध्ये फेल होतोय की काय असं प्रेक्षकांना वाटलं होतं. पण त्याने उत्तर दिले की कॅटरिनाला 6 बहिणी आणि 1 भाऊ आहे. एवढंच नाही तर सलमानने कॅटरिनाच्या सगळ्या भाऊ बहिणींची नावे देखील कपिल शर्माच्या शोमध्ये प्रेक्षकांसमोर सांगितली.

यावरून हे नक्कीच सिद्ध होतंय की सलमान कॅटरिनाच्या कुटुंबाला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो.

महत्त्वाच्या बातम्या-

काय सांगता… सलमानचं लग्न ठरलं होतं? पत्रिका देखील वाटल्या होत्या मग झालं काय?

यापेक्षा वाईट काय नसतंय! स्वत:चा शेवटचा सिनेमाही न पाहाता जगाचा निरोप घेतलेले कलाकार

हे देखील वाचा