काय सांगता… सलमानचं लग्न ठरलं होतं? पत्रिका देखील वाटल्या होत्या मग झालं काय?


बॉलिवूडचा दबंग, भाईजान सलमान खान हा बॉलिवूडचा असा गॉडफादर आहे की ज्याच्यामुळे अनेकांची करियर्स बनली देखील आहेत आणि अनेकांची बिघडली देखील आहेत. इतका प्रचंड प्रभाव सलमानचा आजमितीला बॉलिवूड वर आहे. अनेकांचा सलमान हा हक्काचा मित्र आहे. काहींच्या तर आयुष्याचा सारथी आहे. परंतु या सलमानच्या आयुष्यात त्याला हवी तशी साथीदार अजूनही आलेली नाही.

आज सलमान वयाच्या पन्नाशीपलीकडे पोहोचला असला तरी त्याच्या व्यक्तिगत सांसारिक आयुष्याला अजूनही सुरुवात झालेली नाही. बॉलिवूडच्या अनेक तारकांसोबत त्याचं नाव जोडलं गेलं मात्र लग्नाच्या गाठी कुणाशीही जुळू शकल्या नाही. बॉलिवूड सह संपूर्ण देशाला सतावणारा हा प्रश्न आहे की, सलमानचं लग्न नेमकं होणार तरी कधी? परंतु आपल्याला ठाऊक आहे का काही वर्षांपूर्वी सलमानच्या घरी सनई चौघडे वाजले होते. सलमानच्या नावाच्या पत्रिका सगळीकडे वाटल्या गेल्या होत्या. लग्नाची सर्व तयारी झाली होती पण अखेरच्या क्षणी सलमान लग्नातली घोडी काही चढू शकला नाही. तिथून आजतागायत त्याचं लग्नाचं स्वप्नं हे स्वप्नंच राहिलं. कोण होती ही अप्सरा जिच्याशी सलमानचा विवाह होता होता राहिला आज आपण याच बद्दल जाणून घेणार आहोत.

आता आपण जर सलमानचे खूप मोठे चाहते असाल तर त्या अभिनेत्रीच्या विचारात पडले असाल नाही का? अनेक तर्क लावत असाल, कोण असेल ती अभिनेत्री या विचारांमध्ये गुंतले असाल. पण जरा थांबा सगळं काही सांगतो. आपल्याला सांगायचं झालं तर ती अभिनेत्री आजसुद्धा लग्न मोडल्यानंतरही सलमानची खूप चांगली मैत्रीण आहे आणि दोघांनाही बर्‍याच वेळा एकत्र पाहिलं देखील गेलं आहे. आता आपली उत्सुकता आणखी शिगेला न पोहोचवता नाव सांगूनच टाकतो. त्या अभिनेत्रीचं नाव आहे संगीता बिजलानी! होय बरोबर वाचलंत. जी ऐकेकाळी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची पत्नी देखील होती.

संगीता बिजलानी ही नव्वदीच्या दशकातली सुंदर अभिनेत्री! त्रिदेव, हातिमताई आणि तहकीकात सारख्या चित्रपटात काम करणारी तीच संगीता बिजलानी जिने त्यानंतर १९९६ मध्ये क्रिकेटर मो. अझरुद्दीनशी लग्न केलं. पुढे जाऊन त्यांचा घटस्फोट देखील झाला. परंतु या सगळ्या आधी संगीता ही सलमान सोबत नात्यात होती.

संगिता बिजलानी आणि सलमान खान हे १९८६ सालापासून एकमेकांना डेट करत होते. त्यावेळी संगिता चित्रपटांमध्ये फारशी दिसली नव्हती. कालांतराने ते एकमेकांच्या प्रेमात पडले. इतके की पुढची दहा वर्षे ते एकत्र होते. इतक्या मोठ्या रिलेशनशिपमुळे दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. झालं दोघांच्याही घरी उत्साहाचं वातावरण होतं. लग्नाची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली होती. सलमानच्या बाजूने तर अनेक ठिकाणी लग्नाच्या पत्रिकांचं वाटप देखील करण्यात आलं होतं. परंतु अखेरच्या समयी कुठेतरी माशी शिंकली आणि सलमान – संगिताचं लग्न मोडलं. सलमान ने बऱ्याचदा आपल्या मुलाखतींमधून या बद्दल कबुली दिली आहे.

त्यावेळच्या बतम्यांनुसार सलमान खान आणि अभिनेत्री सोमी अली यांच्यातील जवळीक वाढत होती. संगीताला जेव्हा सलमान सोमी अलीशी जवळीक साधत असल्याचं समजलं तेव्हा तिने हे लग्न मोडण्याचा विचार केला आणि अखेर दोघांचं लग्न मोडलं. पण तरीही, आज सलमान आणि संगीता यांच्यात अजूनही एक घनिष्ठ मैत्री आहे.

यानंतर सलमांनचं नाव अनेक अभिनेत्रींनसोबत जोडलं गेलं. यात ऐश्वर्या रॉय, कॅटरिना कैफ, लुलिया वंतूर यांचा समावेश आहे. परंतु अखेर या प्रत्येक अभिनेत्रीसोबत सलमानचं ब्रेक अप झालं. काय मग आवडला ना आपल्याला सलमानच्या लग्नाचा हा भन्नाट किस्सा!


Leave A Reply

Your email address will not be published.