Wednesday, July 3, 2024

भेटवस्तू घेऊन आलेल्या चाहत्यासोबत सलमान खानने केली ‘अशी’ वर्तनुक, नेटकऱ्यांनी घेतली शाळा

बॉलिवूड स्टार सलमान खानची (Salman Khan) फॅन फॉलोविंग खूप आहे, तर ट्रोल करणाऱ्यांचीही काही कमी नाही. यावेळी तो त्याच्या एका चाहत्यासोबत गैरवर्तन करून, पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. मुंबई विमानतळावरील सलमानचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये तो त्याच्यासाठी गिफ्ट घेऊन आलेल्या चाहत्यासोबत वाईट वागताना दिसत आहे.

हा व्हिडिओ मुंबई विमानतळाचा आहे, जिथे अनेक फॅन्स आणि पॅपराझी त्यांच्या आवडत्या स्टार्सची झलक पाहण्यासाठी तासनतास वाट पाहत असतात. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सलमान कारमधून खाली उतरताच एक चाहता त्याच्याकडे फोटो फ्रेम घेऊन येतो. पण सलमानचा स्टार्सवावा ऍटिट्यूड या व्हिडिओतून पुन्हा एकदा समोर आला आहे. भेटवस्तू घेऊन आलेल्या व्यक्तीला पाहून तो विचित्र चेहरा करू लागतो आणि त्याच्यासोबत विचित्र मूडमध्ये फोटो काढताना दिसतो. (salman khan misbehaved with fan at mumbai airport)

भेटवस्तू घेऊन आलेल्या चाहत्यासोबत सलमानचे हे वागणे नेटकऱ्यांना अजिबात आवडले नाही आणि तो त्यांच्या निशाण्यावर आला. अनेकांनी कमेंट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी असेही म्हटले आहे की, पूर्वी ते सलमानला पसंत करायचे, पण आता त्याच्या ऍटीट्यूडमुळे तो आवडत नाही. काही लोक म्हणतात की, सलमान त्या व्यक्तीला पाहून विचित्र चेहरा का करत आहे, त्याने तर त्याच्यासाठी गिफ्ट आणले होते.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सलमान खान शेवटचा ‘अंतिम’मध्ये दिसला होता. सध्या तो त्याच्या आगामी ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे . याशिवाय तो कॅटरिना कैफसोबत ‘टायगर ३’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा