Tuesday, June 6, 2023

सलमान खानशी संबंधित विचित्र किस्से जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, ‘अशा’ कामांचा होता त्याला छंद

बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) हा चित्रपट जगतातील सर्वात मोठा सुपरस्टार आहे. आपल्या चित्रपटांमध्ये धमाकेदार अ‍ॅक्शनसाठी ओळखल्या जाणाऱ्या सल्लूला वेगवेगळे छंद आहेत. बॉडी बनवण्याचा छंद असो किंवा रस्त्यावर सायकल चालवण्याची सवय असो. लहानपणापासूनच सलमान खानला अशी कामे आवडतात, जी करताना त्याला खूप मजा येते. दरम्यान, या आज आम्ही तुम्हाला दबंग खानच्या अशाच काही छंदांबद्दल सांगणार आहोत, जे जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

बागेतील आंबे चोरून खात असे सलमान
अनेक प्रसंगी सलमान खानचे वडील सलीम खान (Saleem Khan) यांनी खुलासा केलाय की, बालपणी त्यांच्या तीन मुलांपैकी सलमान सर्वात जास्त खोडकर होता. खरं तर, लहानपणी सलमान ग्वाल्हेरच्या सिंधिया स्कूलमध्ये शिकायचा. शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तो जेव्हा कधी इंदूरला जायचा, तेव्हा त्या काळात तो सायकलवर खूप फिरत असे. सायकलवर दूरवर तो जाऊन मित्रांसोबत बागेत आंबे खात असे. दबंग खान अनेकदा मित्रांसोबत बागेतील बोर आणि आंबे चोरायचा. (salman khan have funniest hobbies stories make you laugh)

विहिरीत शिकला पोहायला
सलमान खानने स्विमिंगमध्ये प्रभुत्व मिळवले आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. याचा उल्लेख खुद्द सलमानने अनेक प्रसंगी केला आहे. पण लहानपणी सलमानला पाण्यात पोहायला खूप भीती वाटत होती. त्यामुळे एके दिवशी त्याच्या मोठ्या आईने त्याची भीती संपवण्यासाठी दोरीच्या साहाय्याने त्याला विहिरीत ढकलले. यानंतरच सलमानची पाण्यात बुडण्याची भीती संपली.

स्कूटर आणि बैलगाडी चालवण्याचा होता छंद
तरुणपणी, जेव्हा सलमान खान कॉलेजमध्ये असायचा, तेव्हा त्याला एक विचित्र छंद जडला होता. जिथे एकीकडे लोक बाईकने कॉलेजला जायचे. तर तिकडे सल्लू भाई स्कूटरने कॉलेजला जायचा. याशिवाय अनेक प्रसंगी सलमान गावोगावी फिरताना बैलगाडी चालवण्याचा आनंद घेत असे.

बाईक स्टंटच्या नादात मोडून घेतला होता हात
सहसा बाईकप्रेमी स्वच्छ-सरळ रस्त्यावर बाईक चालवतात. पण सलमान खानला हटके गोष्टी करण्याची सवय आहे. जुन्या काळात सलमान खान खडबडीत रस्त्यावर बाइक आणि जीपमधून स्टंट करत असे. अशा परिस्थितीत, एकदा सलमान खान बाईकसोबत स्टंट करण्याच्या नादात आपला हात मोडून बसला होता. ज्यामुळे त्याला वडील सलीम यांच्या जोरदार रोषाचा सामना करावा लागला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा