Thursday, July 18, 2024

‘या’ हॉलिवूड अभिनेत्रीला डेट करतोय सलमान खान? व्हायरल फोटोने रंगवल्या चर्चा

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान (Salman Khan) अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आजपर्यंत अभिनेत्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. आता पुन्हा एकदा अभिनेत्याच्या अफेअरच्या चर्चेने जोर धरला आहे. आता सलमान त्याची नवीन मैत्रीण समंथा लॉकवुडमुळे (Samantha Lockwood) चर्चेत आहे. खरं तर अलीकडेच विदेशी मॉडेल समंथा लॉकवुडचे अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

सलमानचे समंथासोबत फोटो व्हायरल
या फोटोंमध्ये समंथा कमालीची सुंदर दिसत होती. पण एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, ते म्हणजे सलमान खानसोबतचा फोटो. सलमान आणि समंथाला एका फोटोमध्ये एकत्र पाहून चाहत्यांना अंदाज येऊ लागला आहे, की दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजत आहे!

सलमान खानसोबत समंथाचा फोटो व्हायरल होताच, तिला अभिनेत्याची नवीन परदेशी गर्लफ्रेंड म्हटले जात आहे. तरी समंथा लॉकवुडने अद्याप या गोष्टींवर कोणतीही विशिष्ट प्रतिक्रिया दिली नाही.

कोण आहे समंथा लॉकवुड
समंथा ही हॉलिवूड अभिनेत्री आहे. एका मुलाखतीदरम्यान समंथाला सलमान खानबद्दल विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणाली, “तो खूप चांगला आहे.”

दिलेल्या एका मुलाखतीत समंथा लॉकवुडने सलमानसोबतच्या लिंकअपच्या बातम्यांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. ती म्हणाली, “मला वाटते की लोक वेगवेगळ्या प्रकारे बोलतात. आपण त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. एखाद्या गोष्टीबद्दल बोलणे हे लोकांचे काम आहे. मी सलमानला भेटले आहे, तो खूप छान आहे. त्यांच्याबद्दल एवढेच म्हणायचे आहे. लोकांना या सगळ्या गोष्टी कुठून मिळतात!”

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. कोरोनामुळे त्याच्या आगामी ‘टायगर ३’ या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. याशिवाय अभिनेता ‘कभी ईद कभी दिवाली’चे शूटिंग करणार आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा