Saturday, September 7, 2024
Home बॉलीवूड Salman khan House Gunshoot | सलमान खानच्या घराबाहेर पहाटे गोळीबार, पोलिसांच्या वाढवली सुरक्षा व्यवस्था

Salman khan House Gunshoot | सलमान खानच्या घराबाहेर पहाटे गोळीबार, पोलिसांच्या वाढवली सुरक्षा व्यवस्था

Salman khan House Gunshoot |बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात लोकांनी सलमानच्या वांद्रे येथील घराबाहेर 3 राऊंड गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर दुचाकीवरून आले होते. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा तपासासाठी घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्याच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर आज हवेत गोळीबार करण्यात आला आहे. दोन दुचाकीस्वार हल्लेखोरांनी घराबाहेर हवेत अनेक राऊंड गोळीबार करून पळ काढला. दोन्ही गोळीबार करणाऱ्यांनी हेल्मेट घातले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही.सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आता क्राइम ब्रँचची टीमही घटनास्थळी हजर असून गोळ्यांच्या खुणा तपासत आहेत.

अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या
अभिनेता सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. गेल्या वर्षी पंजाबी गायक सिद्धू मूस वालाच्या हत्येनंतर सलमानला गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई या गुंडांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. सलमानला धमकीचा ई-मेल आला होता, त्यानंतर मुंबई पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

राम चरणच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा, चेन्नई विद्यापीठ मानद पदवी देऊन करणार सन्मानित
कंगना राणौतने शेअर केला हेमा मालिनीचा 20 वर्ष जुना व्हिडिओ; म्हणाली, ‘मजामस्ती करणारे लोक आज…’

हे देखील वाचा