Friday, November 14, 2025
Home बॉलीवूड नाही तोडू शकला ‘राधे’ चित्रपट सुशांतच्या चित्रपटाचा रेकॉर्ड, तरीही कमावले ‘इतके’ कोटी

नाही तोडू शकला ‘राधे’ चित्रपट सुशांतच्या चित्रपटाचा रेकॉर्ड, तरीही कमावले ‘इतके’ कोटी

सलमान खानच्या प्रत्येक चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे यंदा त्याचा चित्रपट कोरोनामुळे ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. सलमान खानचा चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ हिट झाला आहे. हा दावा सलमानची टीम, आणि झी स्टुडिओची पीआर टीम दोघेही करत आहेत. या चित्रपटाला बर्‍याच माध्यमांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे, तर एक वर्ग राधेविरोधात जोरदार मोहीम राबवत आहे.

सलमानचा चित्रपट आला की, विवाद ही नवीन गोष्ट राहिली नाही. सलमानलाही याची सवय झाली आहे, म्हणून तो स्वत: शांत राहतो, आणि आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा आनंद कायमच घेत असतो. कारण महत्वाची गोष्ट म्हणजे तो त्याच्या चित्रपटांमधून भरपूर कमाई करतो.

सलमानच्या राधे चित्रपटाने शनिवार, व रविवारच्या दिवशी ८.९ दशलक्ष व्ह्यूज मिळवले आहेत. ओटीटीवर प्रसिद्ध झालेला अक्षय कुमारचा चित्रपट ‘लक्ष्मी’, आणि सुशांतसिंग राजपूतचा ‘दिल बेचारा’, या चित्रपटांपेक्षा व्ह्युवरशिप आकडेवारीत राधे बराच मागे राहिला आहे. आठवड्याच्या शेवटी लक्ष्मीला १५ दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते, तर सुशांतसिंग राजपूत याच्या चित्रपटाला ९५ दशलक्ष व्ह्यूज मिळाले. हे दोन्ही चित्रपट हॉटस्टारवर प्रदर्शित झाले होते.

सलमानच्या राधे चित्रपटाला सुशांतसिंग राजपूतच्या चाहत्यांनी ट्रोल केले होते, आणि ट्विटरवर राधे याच्यावर दोन दिवस बहिष्कार घालण्याची मोहीम चालविली होती. सुशांतचे चाहते दररोज ट्विटरवर सक्रिय असतात, आणि त्याच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी यंत्रणेकडे विनवणी करत असतात.

यात सलमानच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी अशी आहे की, जर ८.९ दशलक्ष व्ह्यूजच्या आकड्याला रुपयामध्ये रूपांतरित केले तर, हा आकडा २०० कोटींपेक्षा जास्त म्हणजेच सलमानच्या चित्रपटाने आठवड्याच्या शेवटी २०० कोटींचा व्यवसाय केला आहे. सलमानने जगभरातील बॉक्स ऑफिसवरुन सुमारे २० कोटींची कमाई केली आहे. आणि कोरोना कालावधीत २२० कोटी रुपये कमावले, त्यानंतर कमाईच्या बाबतीत पुढील विक्रम मोडला जाईपर्यंत, सुलतान हाच चित्रपट आहे.

काही तासांतच राधे या चित्रपटाची कॉपी करुन, अनेक ठिकाणी पाठविण्यात आली होती. झी स्टुडिओ आणि सलमान खान यांनी त्याविरोधात मुंबईच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली, पण पोलिसांना या प्रकरणात अद्याप यश मिळू शकलेले नाही. प्रत्येक चित्रपट पायरसीमुळे ग्रस्त आहे. अशा परिस्थितीत सरकारने यासाठी मोठे धोरण आखण्याची गरज आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अब हम ७ में!’ १ तासाची शॉपिंग अन् अवघ्या १५ मिनिटांत लग्न; ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी चढली बोहल्यावर

-‘आमच्यामधील मैत्री कायम राहील’, म्हणत ‘सीआयडी’ फेम अभिनेता ऋषिकेश पांडेने केला घटस्फोटचा खुलासा

-‘दान करण्याची ऐपत नसेल, तर लोकांकडे भीक का मागता’, बॉलिवूड अभिनेत्याने साधला विराट अन् आलियावर निशाणा

हे देखील वाचा