Friday, January 10, 2025
Home बॉलीवूड गोल्डी ब्रारनेच पाठवला सलमानला धमकीचा मेल, पोलिसांनी युके सरकारला पाठवले लेटर ऑफ रिक्वेस्ट

गोल्डी ब्रारनेच पाठवला सलमानला धमकीचा मेल, पोलिसांनी युके सरकारला पाठवले लेटर ऑफ रिक्वेस्ट

दबंग खान सध्या खूपच गाजत आहे. एकत्र त्याचा टायगर ३ सिनेमा त्यात शाहरुख खानचा कॅमिओ, सोबतच त्याचा लवकरच प्रदर्शित होणारा किसी का भाई किसी जान सिनेमा, आणि त्यात त्याला लॉरेन्स बिश्नोईने दिलेल्या धमकीमुळे तर सर्वच इतर गोष्टी मागे पडल्या आणि सलमान मीडियामध्ये तुफान गाजू लागला. १८ मार्च २०२३ सलमान खानला धमकीचा मेल आला. हा मेल गोल्डी ब्रारने केला होता. या मेलनंतर दाखल केलेल्या तक्रारीवरून चौकशी करताना मुंबई पोलिसाना मेलचे युके कनेक्शन सापडले. सांगितले जात आहे की, युकेवरून हा मेल केला गेला आहे. मात्र मुंबई पोलिसांना शंका आहे की, हा मेल गोल्डी ब्रारनेच केला आहे.  

या प्रकरणात मुंबई पोलिसांनी इंटरपोलची मदत घेतली असून, कायदेशीर पद्धतीने ब्रिटिश सरकारच्या संबंधीत विभागाला लेटर ऑफ रिक्वेस्ट पाठवली आहे. या लेटरसोबत मुंबई पोलिसांनी या केस संदर्भात अधिक माहिती देखील जोडली असून, यूकेमधील कोणत्या जागेवरून मेल केला आहे, त्याची माहिती देण्यात आली आहे. सोबतच युके सरकारला पोलिसांनी आयपी ऍड्रेस देखील पाठवला आहे.

मात्र अजूनही युके सरकारकडून या गोष्टीची सत्यता होणे बाकी आहे. माहिती पाठवल्यानंतर मुंबई पोलिसाना वाटणारी शंका खरी निघाली तर मुंबई पोलीस गोल्डीला भारतात आणण्याचा प्रयत्न करतील. काही दिवसांपूर्वीच सलमानचे मॅनेजर असलेल्या प्रशांत यांना एक मेल मिळाला होता ज्यात सलमानला माफी मग नाहीतर जिवेमारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर प्रशांत यांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली पोलिसांनी देखील सलमानला सुरक्षा पोहचवली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“पाकिस्तानमध्ये नाही तर भारतात मिळते प्रेम” पाकिस्तानमधील ‘या’ अभिनेत्रीने सांगितले सत्य

VIJAY VIKRAM SINGH: नैराश्याचा सामना, दारूचे व्यसन, गंभीर आजार आदी गोष्टींवर मात करत बनले ‘बिग बॉसचा आवाज’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा