Tuesday, October 14, 2025
Home मराठी …अन् बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली देण्यासाठी सलमान खानने स्टेजवर केलं ‘असं’ काही

…अन् बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली देण्यासाठी सलमान खानने स्टेजवर केलं ‘असं’ काही

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) त्याच्या चाहत्यांमध्ये सतत चर्चेत असतो. चाहते त्याच्यावर खूप प्रेम करतात. लाखो युजर्स सलमान खानला सोशल मीडियावर फॉलो करतात. म्हणूनच त्याचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट होताच व्हायरल होऊ लागतात. सलमान खानचे अनेक फॅन पेजही आहेत. ज्यावर सलमानचे चाहते त्याचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात. अशातच आता सलमान खानचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. सलमानचा हा व्हिडिओ पाहून, चाहते त्याचे भरभरून कौतुक करत आहेत. तसेच, हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

बाळासाहेब ठाकरेंना दिली आदरांजली
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सलमान खान बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली देताना दिसत आहे . बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यापूर्वी अभिनेता व्यासपीठावर बूट काढून जातो. त्यानंतर त्याने त्यांच्या प्रतिमेसमोर जाऊन त्यांना पुष्प अर्पण केले. सलमानने बाळासाहेब ठाकरेंबद्दल असा आदर व्यक्त केल्याने, चाहते खूप प्रभावित झाले आहेत. यावेळी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांच्याही प्रतिमा होत्या. (salman khan removes his shoes before paying respects to bal thackeray)

खरं तर हा आनंद दिघे यांच्यावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा सोहळा होता. हा इव्हेंट मुंबईतील ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला सलमानसोबत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तसेच यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सलमान खान शेवटचा ‘अंतिम’मध्ये दिसला होता. सध्या तो त्याच्या आगामी ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे . याशिवाय तो कॅटरिना कैफसोबत ‘टायगर ३’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा