×

जेव्हा हाणामारीपर्यंत पोहचलं सलमान- रणबीरचं भांडण, रागाच्या भरात भाईजानने थेट अभिनेत्याचा…

बॉलिवूडमध्ये प्रेम प्रकरण आणि वाद विवाद सामान्य आहेत. सलमान खान (Salman Khan) आणि रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) दुष्मनी तर तुम्हाला माहीतच असेल. पण हा वाद कॅटरिना कैफमुळे (Katrina Kaif) सुरू झाला नव्हता. ही त्या दिवसांची गोष्ट आहे, जेव्हा रणबीर कपूर चित्रपटात आलाही नव्हता. तो नेहमी वांद्रे येथील पबमध्ये पार्टी करायला जायचा. असे म्हटले जाते की, एकदा सलमान खान आणि संजय दत्त (Sanjay Dutt) देखील याच पबमध्ये पार्टी करायला गेले होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी सलमान खान फुल मूडमध्ये होता आणि त्याचा खास मित्र संजू बाबासोबत खूप मजा करत होता. या धमालमस्तीत त्याचा रणबीर कपूरसोबत वाद झाला. यावेळी उपस्थित लोकांनी मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला, मात्र हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले.

सांगितले जाते की, या भांडणात रणबीर कपूरचा शर्ट सलमान खानच्या हातात आला. जेव्हा लोकांनी दोघांना वेगळे केले, तेव्हा रणबीर कपूरच्या शर्टचा एक भाग सलमान खानच्या हातात आला. मात्र प्रकरण बिघडत असल्याचे पाहून रणबीर कपूर तेथून निघून गेला. त्याच्या जाण्यानंतर संजय दत्तने सलमान खानला सांगितले की, हा ऋषी कपूरचा (Rishi Kapoor) मुलगा आहे. मात्र हे ऐकून सलमान खानला खूप पश्चाताप झाला. (salman khan had torn ranbir kapoor shirt)

रणबीर कपूरसोबत जे केलं, त्यामुळे सलमान खानला खूप वाईट वाटलं होतं. सलमान खानच्या स्टाफचे लोक सांगतात की, यानंतर भाईजानने रणबीर कपूरच्या घरी शंभर नवीन शर्ट पाठवले आणि रात्री झालेल्या गोंधळाबद्दल माफीही मागितली. मात्र कालांतराने सलमान खान पबबद्दल विसरला. रणबीर कपूरलाही त्या घटनेचा विसर पडला होता. पण त्यानंतर ‘अजब प्रेम की गज़ब कहानी’ चित्रपट सुरू झाला. तेव्हा कॅटरिना कैफला सलमान खानची सर्वात खास मैत्रीण म्हटले जात होते.

पण ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटादरम्यान असे काही घडले की, रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ केवळ एकमेकांच्या जवळ आले नाहीत, तर दोघांमध्ये एक नवीन प्रेमकहाणीही सुरू झाली. या अफेअरची बातमी सलमान खानला समजताच त्याला मोठा धक्का बसला. कॅटरिना कैफचे नाव रणबीर कपूरसोबत जोडले गेले, हे सलमान खानला अजिबात आवडले नाही. याबाबत सलमान खानने ऋषी कपूर यांच्याशीही चर्चा केल्याचे बोलले जात आहे.

रणबीर कपूरने हे अफेअर पूर्ण प्लॅनिंग करून सुरू केल्याचे म्हटले जाते. त्या दिवसांत तो दीपिका पदुकोणसोबत (Deepika Padukone) रिलेशनशिपमध्ये होता. पण जेव्हा दीपिकाला त्याच्या नात्याबद्दल कळले, तेव्हा तिने रणबीरसोबत ब्रेकअप केले. यानंतर रणबीर आणि कॅटरिना बराच काळ एकत्र राहिले. दोघांचेही फोटोही व्हायरल झाले होते. पण एके दिवशी रणबीर कॅटरिनाला सोडून आलिया भट्टच्या (Alia Bhatt) प्रेमात पडला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post