Friday, July 12, 2024

सलमान खानच्या घरावर गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई, नऊ आरोपींवर आरोपपत्र दाखल

एप्रिल महिन्यात सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि ते पळून गेले. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले असून त्यात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानी एप्रिलमध्ये झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी विशेष न्यायालयात सहा अटक आरोपी आणि तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह तीन वॉन्टेड व्यक्तींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. गुन्हे शाखेने 1,735 पानांचे आरोपपत्र विशेष MCOC न्यायालयात दाखल केले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “त्यामध्ये तीन खंडांमध्ये विविध तपास कागदपत्रे आहेत.

पुराव्यामध्ये 46 साक्षीदारांचे जबाब आणि सीआरपीसीच्या कलम 164 अंतर्गत दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेल्या साक्षीदारांच्या जबाबांचा समावेश आहे, असे ते म्हणाले. MCOC (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण) कायद्यांतर्गत कबुलीजबाब, एकूण 22 पंचनामे आणि तांत्रिक पुरावे हे आरोपपत्राच्या कागदपत्रांचा भाग आहेत.

14 एप्रिल रोजी सकाळी दोन मोटरसायकलस्वारांनी खान यांच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पाच राऊंड गोळीबार केला. तपासादरम्यान नवनवीन दुवे समोर येत आहेत. सलमान खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्याचा आगामी चित्रपट ‘सिकंदर’ आहे. या ईदच्या दिवशी सलमान खानने या चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा केली होती. पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे. ‘सिकंदर’चे दिग्दर्शन एआर मुरुगदास करत आहेत. सलमानला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत आणि त्याच्या चित्रपटाचीही आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

रितेश-जेनेलियाने घेतला अवयव दान करण्याचा निर्णय, चार वर्षांपूर्वी घेतलेली शपथ
विशाल पांडेची बहीण अरमानवर चिडली; म्हणाली, ‘याची शोमध्ये येण्याची त्याची लायकी नाही…’

हे देखील वाचा