बॉलिवूड अभिनेता आणि लाखो मुलींच्या हृदयाची धडक म्हणून ओळखला जाणार सलमान खान हा नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटनांमुळे चर्चेत असतो. त्याचे नाव इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्रींसोबत जोडले होते. परंतु त्याने आजपर्यंत कोणाशीही लग्न केले नाही. मात्र, तो कधी लग्न करणार आहे? हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच खूप उत्सुक असतात. अनेकवेळा तो देखील त्याच्या रिलेशनबाबत खूप चेष्टा करतो. नुकतेच ‘भाईजान’ने त्याच्या खूप दिवसांपासून असलेल्या एका रिलेशनबाबत खुलासा केला आहे. एवढंच नाही, तर त्याने हे देखील सांगितले त्यांच्यात एक समानता ही आहे की, त्या दोघांनीही आजपर्यंत लग्न केले नाही.
सलमान खानची प्रत्येक लव्हस्टोरी तशी जगजाहीर आहे. परंतु नुकतेच अभिनेत्याने त्याच्या त्या रिलेशनबाबत खुलासा केला आहे, ज्याबद्दल जास्त कोणाला माहीत नाही. सलमान लवकरच टेलिव्हिजनवरील बहुचर्चित शो ‘बिग बॉस १५’ होस्ट करताना दिसणार आहे. अलीकडेच मध्यप्रदेशमधील शोसाठी पत्रकार परिषद होती. यामध्ये सलमान देखील सामील झाला होता. यावेळी त्याने त्याच्या रिलेशनबाबत खुलासा केला आहे. (salman khan reveals his longest relationship says, we both are still unmarried)
सलमान खानने सांगितले की, “बिग बॉस हे एक असे नाते आहे, जे आतापर्यंत खूप काळ चालले आहे. नाहीतर माझी नाती… जाऊद्यात ते. केवळ बिग बॉस हे एकमेव असे रिलेशन आहे, जे माझ्या आयुष्यात कायमस्वरुपी आहे. बिग बॉस आणि माझ्यामध्ये एक समानता अशी आहे की, आम्ही दोघांनी देखील अजून लग्न केले नाही. त्यामुळे आम्ही कोणालाही न घाबरता स्वतःला बॉस समजतो.”
सलमानने पुढे सांगितले की, “बिग बॉससोबत माझे असे पहिलेच नाते आहे, हे इतक्या वेळ चालू आहे. नाहीतर बाकी नाती एवढी टिकत नाही. परंतु बिग बॉसने माझ्या आयुष्यात खूप स्थिरता आणली आहे. कधी कधी हे चार महिने आम्ही नजरेला नजर देखील मिळवत नाही. परंतु जेव्हा वेगळे होतो, तेव्हा मात्र पुन्हा भेटण्यासाठी खूप उत्सुक असतो.”
‘बिग बॉस १५’ च्या प्रेस मीटमध्ये दोन स्पर्धकांच्या नावाचा खुलासा केला आहे. यामध्ये आसिम रियाजचा भाऊ उमर रियाज आणि अभिनेत्री डोनल बिष्ट हे दोघे या शोमध्ये सहभागी होणार आहेत. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून हे दोघेही सामील झाले होते.
यावेळी ‘बिग बॉस १५’ ची थीम खूप खास असणार आहे. या शोची थीम जंगल बेस्ड असणार आहे. सगळे स्पर्धक २५० कॅमेरांच्या कैदेत असणार आहेत. तसेच अशी बातमी आली आहे की, हा शो पाच महिने देखील चालू शकतो. सलमान खान पत्रकार परिषदेत म्हणाला की, “जंगल में मंगल या जंगल में झगडा. मला हसणारे चेहरे बघायचे आहेत. मर्यादित भांडण, थोडासा रोमान्स आणि भरपूर खेळ खेळू. मी स्पर्धकांना स्वतःसाठी आणि आणि काहींना आपल्या मानसांसाठी भांडताना पाहू इच्छितो.”
नुकतेच ‘बिग बॉस ओटीटी’ संपले आहे. त्यामुळे आता सगळ्या प्रेक्षकांना ‘बिग बॉस १५’ चे वेध लागले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-TMKOC: एकेकाळी कर्जात पूर्णपणे बुडाला होता ‘सोढी’; मग कर्जदारांपासून वाचण्यासाठी केलं ‘हे’ काम
-लग्नानंतर प्रथमच बिकिनीमध्ये दिसली दिशा परमार; मालदीवमध्ये पती राहुलसह करतेय सुट्ट्या एन्जॉय