Friday, April 10, 2026
Home बॉलीवूड अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त सलमान खाननी फोटो शेअर करत दिल्या खास शुभेच्छा

अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त सलमान खाननी फोटो शेअर करत दिल्या खास शुभेच्छा

सलमान खान हा बॉलिवूडमधील सुपरस्टार आहे. तसेच सलमान खानने अनेक उत्तम   चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत. तर तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतो. तर सध्या तो त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वर अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. तर या फोटोमध्ये अंनत आणि सलमान आहेत. तर या पोस्टला कॅप्शमध्ये सलमानने त्यांना आपला धाकटा भाऊ म्हटले आणि त्यांचे वर्णन सर्वात निःस्वार्थी, दयाळू व्यक्ती आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान असे लिहले आहे.

नीता अंबानी आणि मुकेश (mukesh)अंबानी यांनी आयोजित केलेल्या अनंत अंबानींच्या वाढदिवसाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सलमान खान जामनगरला गेल्यानंतर लगेचच ही पोस्ट केली आहे. हा कार्यक्रम स्टार्सनी भरलेला होता, ज्यात इंडस्ट्रीतील अनेक प्रमुख व्यक्तींनी हजेरी लावली होती. शाहरुख खान, रणवीर सिंग, अनन्या पांडे, शनाया कपूर, अगस्त्य नंदा, बोनी कपूर, गौरी खान आणि राम चरण यांच्यासह अनेक सेलिब्रिटी जामनगरमध्ये दाखल झालेले दिसले, ज्यामुळे हा अलीकडच्या काळातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या सोहळ्यांपैकी एक ठरला.

तर आता सलमान खान त्याच्या आगामी चित्रपट ‘मातृभूमी’ मुळे हि चर्चेत आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शिन सलमान खान सध्या अपूर्व लाखिया करत आहेत. तर या आगामी ‘मातृभूमी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये ते व्यस्त आहेत. या चित्रपटाचे पूर्वीचे नाव ‘बॅटल ऑफ गलवान’ होते आणि तो 17 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र निर्मात्यांनी अद्याप नवीन प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

‘धुरंधर 2’ला प्रोपेगेंडा म्हणणाऱ्यांवर भडकले संदीप रेड्डी वांगा, ॲनिमलचे दिग्दर्शकांनी आदित्य धर यांचीही केली स्तुती

हे देखील वाचा