Monday, July 1, 2024

टायगर झाला जखमी! सलमान खान शूटिंग दरम्यान जखमी फोटो शेअर करत दिली माहिती

सलमान खानने त्याचा किसी का भाई किसी की जान सिनेमा फ्लॉप गेल्यानंतर आता त्याचे संपूर्ण लक्ष आगामी ‘टायगर 3’वर केंद्रित केले आहे. या सिनेमस्तही तो खूपच मेहनत करताना दिसत आहे. सध्या या सिनेमाची शूटिंग सुरु आहे. याच शूटिंग सेट्वरुन एक बातमी येत आहे. या बातमीमुळे अनेकांची चिंता वाढली आहे. सलमानने नुकताच त्याचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून लक्षात येते की, सलमान जखमी झाला आहे.

सलमान खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याचा एक पाठमोरा फोटो शेअर केला असून, त्याच्या पाठीवर डाव्या बाजूला रिलीविंग पॅच लावलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करताना सलमान खानने कॅप्शनमध्ये लिहिले, “जेव्हा तुम्हाला वाटते की जगाचा भर तुमच्या खांद्यांनी उचलला आहे, ठेवो तो म्हणतो, जगाला सोड आधी पॅच किलोचे डम्बल उचलून तर दाखव. #टाइगर जख्मी है. टाइगर 3.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमान खानचा हा फोटो आणि पोस्ट कमालीची व्हायरल झाली असून, ही पोस्ट पाहून अनेकांनी त्याच्यावर कमेंट केली आहे. सर्वानाच सलमान खान ठीक आहे ना हेच जाणून घ्यायचे आहे. सगळ्यांनी कामनेट्स करत त्याची आताची तब्येत ठीक आहे ना? जास्त जखम झाली नाही ना? असे अनेक प्रश्न विचारत त्याची तब्येत लवकर बरी होण्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान सलमान खानचा ‘टायगर 3’ हा यशराजचा स्पाय युनिव्हर्सचा पाचवा सिनेमा आहे. या सिनेमात सलमानसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोबतच चित्रपटात शाहरुख खान देखील पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘टायगर 3’ सिनेमा येत्या दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी सिनेमाचे दोन भाग ‘एक था टाइगर’ आणि ‘टाइगर जिंदा है’ ब्लॉकबस्टर ठरले होते. सलमानला देखील या सिनेमाकडून खूपच अपेक्षा आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

“मला चित्रपटात काम करायचे नव्हते तसे करायचे असते तर….” मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने केला होता करियरबद्दल खुलासा

आईच्या भूमिकेतील रीमा लागू यांचा दमदार अभिनय पाहून इनसिक्योर झाल्या होत्या श्रीदेवी, उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

हे देखील वाचा