सलमान खान म्हटले की, डोळ्यासमोर येतात ते त्याचे हिट सिनेमे, त्याचा दबंग अवतार आणि त्याची आकर्षक बॉडी. खरंतर सलमान खानची पहिली आणि मोठी ओळख म्हणजे त्याचा शर्टलेस अवतार. अगदी त्याच्या पहिल्याच सिनेमापासून सलमानने त्याची शर्टलेस बॉडी ही ओळख जपलेली आहे. मुख्य म्हणजे प्रेक्षकांना त्याची हीच ओळख सर्वात जास्त आवडते. सलमानला चित्रपटांमध्ये शर्टलेस बघणे म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. त्याच्या या सीन्सवर शिट्या आणि टाळ्या ठरलेलाच असतात. मात्र आता सलमानने त्याची बॉडी दाखवणे जरा कमी केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त सलमान त्याची बॉडी खूपच कमी म्हणजे अगदी ना च्या बरोबर दाखवताना दिसतो.
मात्र सलमानला पुन्हा एकदा शर्टलेस बघण्याची संधी त्याने सर्वांना दिली आहे. सोशल मीडियामध्ये बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या सलमान खानने नुकताच त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सलमान शर्टलेस असल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोत सलमानचा फिटनेस आणि त्याचे ऍब्स पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये सलमानने त्याच्या बिईंग ह्युमन या त्याच्या एनजीओची टोपी देखील घातली आहे. मात्र सलमानने या फोटोला दिलेले कॅप्शन पाहून सलमान या फोटो त्याची बॉडी नाहीतर त्याची टोपी फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
हा फोटो शेअर करताना सलमानने लिहिले, ‘ही बिईंग ह्युमनची टोपी चांगली आहे ना’. त्याच्या या फोटोला नेटकरी आणि कलाकार देखील तुफान पसंत करत आहेत. सोबतच फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुद्धा पाहायला मिळत आहे. सलमानच्या या फोटोवर एका नेटकऱ्याने कमेंट करताना म्हटले, “सलमान काय मजा करतोस का? तू शर्टलेस असताना तुझ्या टोपीकडे कोणत्या मुर्खाचे लक्ष जाईल.” तर एक नेटकरी म्हणाला, “टोपी ही फक्त बॉडी दाखवण्याचे निमित्त आहे.” तर एकाने लिहिले, ‘भाईची बॉडी बेस्ट आणि टोपी सुद्धा बेस्ट’.
मात्र या सर्व कमेंट्समध्ये एका कमेंट्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, आणि ती कमेंट म्हणजे सलमानची एक्स गर्लफ्रेंड असलेल्या संगीता बिजलानीची. होय सलमानच्या या फोटोवर संगीता बिजलानीने कमेंट करत फायर ईमोजी पोस्ट केले आहेत. संगीता आणि सलमान ९० च्या दशकात एकेमकांना डेट करत होते. त्यांचे नाते लग्नापर्यंत देखील गेले, मात्र मधेच माशी शिंकली आणि त्यांचे नाते तुटले. पण आजही संगीता आणि सलमान एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
हेही वाचा :