सलमान खान आणि त्याचे पंगे, अफेयर्स आदी अनेक गोष्टी सर्वश्रुत आहेत. सलमान खानचे नाव नेहमीच वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत जोडले जाते. त्याच्या गर्लफ्रेंडची यादी खूप मोठी आहे. मात्र या सर्वांमध्ये ९० च्या दशकातील अभिनेत्री सोमी अली आणि सलमान खान यांची प्रेमकहाणी आणि ब्रेकअप कहाणी चांगलीच रंगली. त्यांची ही कहाणी सर्वानाच माहित आहे. मात्र आता इतक्या वर्षांनी पुन्हा सलमान आणि सोमी यांचा विषय निघाला याचे करण म्हणजे सलमान खानवर सोनी अलीने केलेले मोठे आणि खळबळजनक आरोप.
View this post on Instagram
सोमी अली मूळची पाकिस्तानची तिचा जन्म कराचीमध्ये झाला मात्र ती अमेरिकेत मोठी झाली. सलमान खानवरील तिचे प्रेम तिला भारतात खेचून घेऊन आले. ती सलमानच्या प्रेमात एवढी वेडी होती की, ती त्याच्यासोबत लग्न करायला देखील तयार होती. सलमान आणि सोमी हे काही वर्ष रिलेशनशिपमध्ये होते, मात्र त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. आता पुन्हा एकदा सोमी सक्रिय झाली असून, तिने नुकतीच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने काही अफवा खऱ्या आहेत की नाही याबद्दल सांगितले.
तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “एक प्रसिद्ध घटना होती की, सलमानने तुझ्या डोक्यावर बाटली फोडली होती. यामध्ये किती तथ्य आहे? खरी गोष्ट काय आहे? जर त्याने मला बाटलीने मारले असते तर मी हॉस्पिटलमध्ये मरण पावली असती. त्याने माझ्या डोक्यावर थम्प्सपचा ग्लास उलटा केला होता.” पुढे सोमीने लिहिले, “तिथे माझी एक एकर मैत्रीण पण होती तिने हे सर्व पाहिले. मी तिचा सन्मान करते आणि तिचे नाव नाही घेत. मात्र त्याने माझ्या डोक्यावर बाटली नाही फोडली. ही चुकीची अफवा आहे.”
View this post on Instagram
पुढे तिने अजून एक प्रश्न जो तिला सतत विचारला जातो तो लिहिला, “सलमानसोबतचे तुझे नाते तुला कसे त्रास देते?” यावर तिने लिहिले, ” मला अजूनही वाईट स्वप्न पडतात. त्याने माझ्यासोबत काय आणि किती चुकीची वर्तवणूक केली. मी अशा करते आणि प्रार्थना करते की हे कधीतरी संपेल.”
दरम्यान सोमी अली बॉलिवूडमध्ये जास्त चालू शकली नाही. तिने ‘कृष्णअवतार’, ‘अंत’, ‘यार गद्दार’ आदी चित्रपटांमध्ये काम केले. मात्र एकही सिनेमात सलमानसोबत दिसली नाही. ती फक्त सलमानसोबतच्या नात्यामुळेच जास्त गाजली.
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मसकली गाण्याच्या रिमेकवर ए.आर रेहमान यांची नाराजी? म्हणाले, ‘मुळ गाणे बनवायला 365 दिवस…’
ए पळा पळा..! गायिकेने असा काही सुर छेडला की, माणसांसह कुत्र्या-मांजरांची झाली पळापळ, पाहा रेहमानने शेअर केलेला भन्नाट व्हिडिओ