Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड सलमान खानच्या बहुप्रतिक्षित ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाचा दमदार अ‍ॅक्शन पॅक्ड टिझर प्रदर्शित

सलमान खानच्या बहुप्रतिक्षित ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाचा दमदार अ‍ॅक्शन पॅक्ड टिझर प्रदर्शित

आज बॉक्स ऑफिससाठी आणि शाहरुख खानच्या फॅन्ससाठी खूपच आनंदाचा दिवस आहे. तब्बल चार वर्षांनी शाहरुख खानचा सिनेमा प्रदर्शित होत आहे. जिथे सर्वांना ‘पठाण’ प्रदर्शित झाल्याचा आनंद होत असून, सलमान खानच्या आगामी सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाल्यामुळे हाच आनंद आता द्विगुणित झाला आहे. पठाण सिनेमासोबत सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळेच आज शाहरुख आणि सलमान खानच्या फॅन्ससाठी ही मोठी ट्रीट समजली जात आहे. मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना शाहरुख आणि सलमान एकाच वेळी पाहायला मिळत असल्यामुळे सर्वच जाम खुशीत आहेत.

तत्पूर्वी सलमान खानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाचा टिझर फुल्ल ऑन ऍक्शनने भरपूर असून, यातला सलमान खानचा डॅशिंग आणि दबंग अंदाज सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या टीझरमधून सलमान खानचे दोन अतिशय भिन्न लूक दिसून आले. एका लूकमध्ये तो मोठी दाढी, लांब केस, जॅकेटमध्ये दिसला तर दुसऱ्या लूकमध्ये तो क्लीन शेव, सूटमध्ये जेंटलमॅन वाटला. या टीझरमध्ये सलमान खानच्या ऍक्शनसोबतच शहनाझ गिल, राघव जुयाल, पलक तिवारी यांसह व्यंकटेश आणि जगपती बाबू आदी कलाकारांची झलक पाहायला मिळाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

या टीझरमध्ये तो एकीकडे गुंडाना मारताना दिसत असून, दुसरीकडे पूजा हेडगेसोबत रोमान्स करताना देखील दिसत आहे. टीझरमधील ‘सही का होगा सही, गलत का गलत।’, ‘मेरा कोई नाम नही. पर मुझे भाईजान नामषे पुकारते है।’ आदी अनेक दमदार डायलॉग लक्षात राहतात. शिवाय टीझरमधील एक विशेष बाब म्हणजे सलमान खान एका सीनमध्ये चक्क साऊथ इंडियन रूपात दिसतो. यात तिने शर्ट आणि लुंगी घातलेली देखील दिसली. त्यामुळे सिनेमात काहीतरी साऊथ इंडियन संबंधित असणार असा अंदाज आता लावला जात आहे.

सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा फरहाद सामजी दिग्दर्शित अ‍ॅक्शन पॅक्ड चित्रपट आहे. चित्रपटात पूजा हेगडे आणि साऊथ स्टार व्यंकटेश दग्गुबाती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंह, अभिमन्यू सिंह, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर या कलाकारांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानच्या स्वतःच्या प्रोडक्शन हाऊसने केली आहे. सिनेमा २०२३च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा-दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शाहरुखवर भाईजान भारी? ‘पठाण’मध्ये सलमानच्या एन्ट्री चित्रपटगृहांमध्ये एकच कल्ला, व्हिडिओ झाले व्हायरल

बापरे! तब्बल 72 कोटींची संपत्ती संजू बाबाच्या नावावर करत चाहतीने घेतला अखेरचा श्वास…

हे देखील वाचा