Saturday, July 6, 2024

सल्लू भाईला मोक्कार टेंशन, धमकीच्या पत्रावर बोलला ‘माझी तर कुणाशीच दुश्मनी नाही आणि गोल्डी बराड मला…’

अलीकडेच सलमान खानचे (Salman Khan) वडील सलीम खान (Salim Khan) यांना धमकीचे पत्र आले होते, ज्यामध्ये सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या पत्रात सलमान खानला गायक सिद्धू मुसेवाला प्रमाणे हत्या करण्याची लिहले होते. तेव्हापासून मुंबई पोलीस कारवाईच्या मार्गावर आहेत. पोलीस या प्रकरणाचा जोरदार तपास करत आहेत. या धमकीच्या पत्रानंतर सलमान खानची सुरक्षाही वाढवण्यात आली होती. या सगळ्या प्रकारावर आता पहिल्यांदाच अभिनेता सलमान खानने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

गायक सिद्धु मूसेवालाच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानला धमकीचे पत्र आले होते. ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. या धमकीच्या पत्रानंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेतही मोठी वाढ करण्यात आली होती. सिद्धु मूसेवालाच्या हत्येचा आरोप असलेल्या बिश्नोई गॅंगने २०१८ मध्ये काळवीट हत्या प्रकरणानंतर सलमान खानला हत्येची धमकी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा धमकीचे पत्र आल्याने सलमानवर भितीचे सावट पसरले आहे. या प्रकरणावर आता पहिल्यांदाच सलमान खानने प्रतिक्रिया दिली आहे.

सलमान खानला “त्याचे गँगस्टर गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्याशी काही संबंध आहेत का?” असे विचारल्यानंतर त्यावर उत्तर देताना “मला धमकीच्या पत्राबद्दल शंका नाही आणि आजकाल माझे कोणाशीही वैर नाही. मी लॉरेन्स बिश्नोईला 2018 पासून ओळखतो कारण त्यानंतर त्याने मला धमकावले होते. पण गोल्डी ब्रार कोण हे मला माहीत नाही,”अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सलमान खानला त्याला कोणत्याही प्रकारे धमक्या आल्या आहेत का? असेही विचारण्यात आले होते.  यावर त्याने सांगितले की,”मला कोणतीही धमकी आलेली नाही. गेल्या काही दिवसांत त्याचे कोणाशीही वाद वा भांडण झाले नाही किंवा त्याला धमकीचे मेसेज किंवा फोन आलेले नाहीत. हे पत्र माझ्या वडिलांना मिळाले होते, ते मला मिळाले नाही.  त्यामुळे मला कोणावरही संशय घेण्यासारखे काही नाही.”

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या सलमान खान त्याच्या आगामी ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, ज्याचे नाव आता बदलले आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे नाव आता ‘भाईजान’ असेल. या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडे, राघव जुयाल, शहनाज गिल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 30 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा