सलमान खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. मागील बऱ्याच दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा होती. अशातच आता सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले आहे. सिनेमाला समीक्षकांनी तसे पाहिले तर काही चांगल्या प्रतिक्रिया दिल्या नाही, मात्र सलमानच्या फॅन्सने त्याला अजिबातच निराश केलेले नाही. सलमान, ईद आणि सुपरहिट हे मागील अनेक वर्षांपासून चालत आलेले समीकरण या वर्षी देखील यशस्वी ठरले आहे.
#KisiKaBhaiKisiKiJaan In Cinemas Now!
Book Tickets Now On:
BMS- https://t.co/BpatoTQfZr
Paytm – https://t.co/DjOAhTtHCH@hegdepooja @VenkyMama @farhad_samji @IamJagguBhai @bhumikachawlat @boxervijender #AbhimanyuSingh @TheRaghav_Juyal @jassiegill @siddnigam_off @ishehnaaz_gill… pic.twitter.com/q10k2FkZ5L— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 21, 2023
आता या सिनेमाला मिळालेले यश पाहून सलमान खानने त्याच्या फॅन्सचे आभार मानले आहे. सलमानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, त्याच्या फॅन्सला सिनेमाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद म्हटले आहे. सलमानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून त्याचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. चित्रपटाचे कौतुक केल्याबद्दल आणि दमदार प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.” सलमान खानने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याचा अंदाज पाहण्याजोगा आहे. ब्लॅक शर्टमध्ये तो कमालीचा हँडसम दिसत आहे. सलमानच्या या पोस्टवर त्याचे फॅन्स कमेंट्स करत त्याला ईदच्या शुभेच्छा तर देतच आहे, सोबतच त्याच्या लूकचे देखील कौतुक करत आहे.
Thank u for all your love n support . Thank u , really appreciate it#KBKJ pic.twitter.com/08tOpfDaiW
— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 23, 2023
प्राप्त माहितीनुसार किसी का भाई किसी की जान सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी भारतातून फक्त १५ कोटींची कमाई केली. सलमान खानच्या आधी रिलीज झालेल्या चित्रपटांच्या तुलनेत या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीची कमाई कमी होती. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. २५.७५ कोटींचा गल्ला चित्रपटाने जमवला. ईदच्या सुट्टीचा फायदा या चित्रपटाला झाला.
सलमानचा हा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट तमिळ चित्रपट ‘वीरम’चा रिमेक आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडे व्यंकटेश दग्गुबती, पलक तिवारी, शहनाज गिल, भूमिका चावला, बॉक्सर विजेंदर सिंग देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
करण जोहरच्या विश्वासामुळे राणी मुखर्जी बनली सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री, आवाजाने दिली नवी ओळख
संजीव कुमार आयुष्यभर अविवाहित असण्याचे कारण होते विचित्र, महिलांबद्दल करायचे ‘असा’ विचार