Monday, July 1, 2024

सिक्स पॅक्सला व्हीएफएक्स म्हणणाऱ्या ट्रोलर्ससाठी शर्टलेस झाला सलमान, फ्लॉन्ट केली टोन्ड बॉडी

सलमान खानचा आगामी बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित किसी का भाई किसी की जान सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाच्या निमित्ताने सलमान मोठ्या गॅपनंतर चित्रपटात दिसणार आहे. हा सिनेमा हिट करण्यासाठी त्याचे प्रमोशन करण्यासाठी तो जंग जंग पछाडत आहे. नुकताच सिनेमाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा भाईजानचा ऍक्शन अवतार पाहायला मिळत आहे. यात तिची बॉडी देखील खूपच आकर्षक दिसली आहे. अनेकांनी तर सलमानने सिनेमासाठी बॉडी बनवली नसून ती व्हीएफएक्सने दाखविल्याचा देखील आरोप त्याच्यावर केला.

जेव्हापासून सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला तेव्हापासूनच सलमानच्या सिक्स पॅक्सवर नेटकऱ्यांनी त्याला ट्रॉल करायला सुरुवात केली होती. अनेकांनी हे सिक्स पॅक्स खोटे असून व्हीएफएक्सने करण्यात आल्याचे देखील सांगितले होते. मात्र या ट्रेलर लाँच सोहळ्यामध्ये सलमानने असे काही केले, जे पाहून सर्वांनाच खासकरून ट्रोलर्स थेट उत्तर मिळाले. किसी का भाई किसी जान या सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी सलमान आणि संपूर्ण स्टारकास्ट अतिशय सुंदर तयार होऊन पोहचली होती. काळ्या रंगाच्या सुटमधे सलमान खान कमालीचा हँडसम दिसत होता.

यावेळी त्याला मीडियाने अनेक प्रश्न देखील विचारले ज्याची त्याने एकापेक्षा एक भारी उत्तरं दिली. याचवेळी त्याला त्याच्या सिक्स पॅक्सवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर देखील त्याला काही प्रश्न विचारले गेले. त्यानंतर या सोहळ्यामध्ये सलमानने अचानक त्याच्या शर्टची बटणं उघडली आणि त्याचे सिक्स पॅक्स सगळ्यांना दाखवले. त्याने त्यांचे कमालीचे आकर्षक असे सिक्स पॅक्स फ्लॉन्ट करत पोज दिल्या. त्याच्या या कृतीमुळे सोशल मीडियावरील ट्रोलर्सला त्याने सणसणीत उत्तरं दिली.

फरहाद सामजी दिग्दर्शित ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमात सलमान खान, पूजा हेगड़े, वेंकटेश दग्गुबाती, जगपति बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यु सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी, विनाली भटनागर आदी कलाकार दिसणार असून, हा सिनेमा २१ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

दुःखद! प्रसिद्ध रंगभूमिकार आणि अक्षरा थिएटरच्या सहसंस्थापक असलेल्या ‘या’ जेष्ठ अभिनेत्रींचे निधन

वयाच्या 15 व्या वर्षी केले सिनेसृष्टीत पदार्पण, लग्न करताना धर्मांतर करून आयशा टाकियाने केले सर्वाना आश्चर्यचकित

हे देखील वाचा