Monday, July 1, 2024

काय सांगता! सलमान खानच्या ‘या’ चित्रपटात एक, दोन नाही, तर असणार दहा नायिका

चाहते बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. तसे तर अभिनेत्याचे अनेक चित्रपट येणार आहेत. पण अलीकडेच त्याच्या एका अशा चित्रपटाविषयी माहिती समोर येत आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल दहा-दहा अभिनेत्री दिसणार असून, या चित्रपटाचे नाव आहे ‘नो एंट्री’.

सलमानच्या चित्रपटात असणार 10 अभिनेत्री
या दिवसांत सलमान खानचे शेड्यूल पूर्णपणे टाइट आहे. अभिनेता सतत चित्रपटांसाठी शूटिंग करत असतात. नुकतेच त्याने ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. त्याने स्वत: त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली. आता त्याच्या आणखी एका चित्रपटाची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अशी बातमी येत आहे की, ‘नो एंट्री’चा सीक्वल येणार आहे, ज्याचे नाव ‘नो एंट्री में एंट्री’ असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात दहा अभिनेत्री असणार आहेत. मात्र, अद्याप या अभिनेत्रींच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही. (salman khan upcoming movie no entry mein entry will have ten actress)

या चित्रपटासाठी फरदीनने कमी केलं होतं वजन
सलमान खानच्या आगामी ‘नो एंट्री’च्या सिक्वेलबद्दल एक अपडेट समोर आले आहे, ज्याचे नाव ‘नो एंट्री में एंट्री’ असणार आहे. वृत्तानुसार, या सिक्वेलमध्ये २००५ मध्ये आलेल्या ‘नो एंट्री’ चित्रपटाचे मुख्य नायक म्हणजेच सलमान खान, अनिल कपूर (Anil Kapoor) आणि फरदीन खान (Fardeen Khan) तिहेरी भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या प्रत्येक पात्रासोबत एक नायिका असेल. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. इतकेच नाही तर या चित्रपटासाठी फरदीन खानने बरेच वजनही कमी केले आहे.

पुन्हा दिसू शकते जुनी स्टारकास्ट
या चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, सलमान या चित्रपटात खूप रस दाखवत आहे. एवढेच नाही, तर चित्रपटाचे शूटिंग लवकरात लवकर सुरू व्हावे, अशी त्याची इच्छा आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला, तर ‘नो एन्ट्री’ची स्टारकास्ट या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. असे म्हटले जात आहे की सलमान, अनिल आणि फरदीन व्यतिरिक्त बिपाशा बसू (Bipasha Basu), ईशा देओल (Esha Deol), लारा दत्ता (Lara Dutta) आणि सेलिना जेटली (Celina Jaitley) देखील मुख्य भूमिकेत असू शकतात, परंतु अद्याप याची पुष्टी झालेली नाही.

सलमानचे चित्रपट
सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता सध्या हैदराबादमध्ये ‘कभी ईद कभी दिवाली’चे शूटिंग करत आहे. याशिवाय तो यशराज बॅनरच्या ‘टायगर ३’ या चित्रपटातही दिसणार आहे. शाहरुख ‘टायगर 3’ मध्ये कॅमिओ करत आहे, पण सध्या तो ‘जवान’ या चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. 2023च्या ईदच्या मुहूर्तावर ‘टायगर 3’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘अन्न तू नाही अल्लाह देतो’, जेव्हा सर्वांसमोर सलमान खानवर चिडल्या होत्या कोरिओग्राफर सरोज खान

‘या’ अभिनेत्यामुळे कॅटरिना कैफने दिलेला का सलमान खान डच्चू?

हे देखील वाचा