Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड सलमान खानने केली चाहत्याची पंचाईत, केस कापण्याच्या बहाण्याने केले थेट टक्कलच व्हिडिओ झाला व्हायरल

सलमान खानने केली चाहत्याची पंचाईत, केस कापण्याच्या बहाण्याने केले थेट टक्कलच व्हिडिओ झाला व्हायरल

सलमान खान (Salman Khan) हा हिंदी चित्रपट जगतातील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या अभिनयाची बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चा पाहायला मिळते. दमदार अभिनय आणि पिळदार बॉडी यामुळे सलमान तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे.  त्याची एक झलक पाहायला त्याचे चाहते अगदी वेडे होतात. सलमानच्या हेअर स्टाईलपासून ते त्याच्या ब्रेसलेटपर्यंत प्रत्येक गोष्ट चाहत्यांसाठी खास असते. त्याचप्रमाणे दिलदार भाईजानही त्याच्या चाहत्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करत असतो. सध्या सोशल मीडियावर सलमान खानचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो एका चाहत्याचे केस कापताना दिसत आहे. काय आहे हा व्हायरल व्हिडिओ चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. सलमान खान त्याच्या चाहत्याचे केस कापण्यासाठी आल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. अत्यंत स्टाईलमध्ये सलमान खान या चाहत्याचे केस कापत आहे . मात्र सलमान खान केस कापता कापता त्या चाहत्याचा पुर्ण टक्कलच केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तरीही भाईजानचा हा चाहता त्याच्यावर खुश झाला आहे. मात्र या व्हिडिओच्या शेवटी सलमान त्याला पैसे मागितल्याचेही दिसत आहे. यावेळी त्याचा चाहताही त्याला १०० ची नोट काढून देतो ज्यामुळे सलमान खान सुद्धा थक्क होतो. या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांच्या जबरदस्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. तर अनेकांनी सलमानला ट्रोलही केले आहे.

दरम्यान अभिनेता सलमान खान लवकरच त्याच्या ‘टायगर ३’ चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटात सलमान आणि कॅटरिनाची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. याआधी एक था टायगर आणि टायगर जिंदा है या चित्रपटांना प्रेक्षकांनी अभूतपुर्व प्रतिसाद दिला होता. सलमान अलिकडेच राधे, अंतिम, बजरंगी भाईजान या चित्रपटांमध्ये झळकला होता. सलमान खानचा कोणताही चित्रपट असो तो त्याच्या अभिनयाने आणि लोकप्रियतेने सुपरहीट ठरत असतो ही भाईजानची खासियत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

शाही लग्नाचा शाही थाट, रणबीर आलियाच्या लग्नासाठी दिल्लीच्या शेफना आमंत्रण, ‘इतक्या’ पदार्थांची असणार मेजवानी

मराठी सिनेसृष्टीतही लवकरच उडणार लग्नाचा बार, विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे ‘या’ दिवशी बांधणार लगीनगाठ

असा आहे आलियाच्या ‘भट्ट’ परिवाराचा इतिहास, पहिल्या पिढीपासूनच आहे चित्रपट जगतात मोठे योगदान

हे देखील वाचा