Saturday, April 20, 2024

असा आहे आलियाच्या ‘भट्ट’ परिवाराचा इतिहास, पहिल्या पिढीपासूनच आहे चित्रपट जगतात मोठे योगदान

सध्या बॉलिवूड जगतात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या (Alia Bhatt) लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. कपूर आणि भट्ट ही चित्रपट जगतातील मोठी घरे मानली जातात. त्यामुळे या शाही विवाह सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. भट्ट कुटूंबाची लाडकी लेक आलिया ‘कपूर’ घराण्याची सूनबाई होणार आहे. ज्या प्रमाणे कपूर घराण्याचे चित्रपट जगतात पहिल्यापासून योगदान आहे त्याप्रमाणेच भट्ट कुटूंबाचीही पहिल्या पिढीपासून चित्रपट जगतात महत्वाचे योगदान राहिले आहे. पाहूया भट्ट कुटूंबाचा पहिल्या पिढीपासूनचा प्रवास. 

पहिली पिढी : 

नानाभाई भट्ट – भट्ट कुटूंबातील पहिले चित्रपट निर्माते म्हणून नानाभाई भट्ट यांचे नाव घेतले जाते. १२ जून १९१५ ला त्यांचा जन्म झाला होता. नानाभट्ट यांनी एकूण १०० हून अधिक चित्रपटांची निर्मीती केली आहे. १९३७ पासून त्यांनी लेखक आणि पटकथा लेखक म्हणून काम केले. ‘मुकाबला’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता ज्यामध्ये त्यांनी डबल रोलची संकल्पना पहिल्यांदा भूमिका राबावली होती. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव हेमलता होते. तर शिरीन मोहम्मद अली यांच्यासोबत त्यांचे विवाहबाह्य संबंध होते. जिच्यापासून त्यांना मुकेश भट्ट आणि महेश भट्ट अशी दोन मुले झाली.

दुसरी पिढी :

रॉबिन भट्ट – रॉबिन भट्ट हे चित्रपट जगतात १९९० पासून काम करत आहेत. लेखक म्हणून ‘आशिकी’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. जो सुपरहीट ठरला. त्यांनी ‘बाजीगर’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ पटकथेचा पुरस्कार पटकावला होता. त्यांनी आत्तापर्यंत ६६ चित्रपटांच्या कथा लिहल्या आहेत.

महेश भट्ट- प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांचा २० सप्टेंबर १९४८ ला जन्म झाला. त्यांनी १९७४ पासून चित्रपट काम करण्यास सुरूवात केली होती. बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी दिग्दर्शक आणि लेखक अशी त्यांची खास ओळख आहे. मंजिले और भी है हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यांनी ‘अर्थ’, ‘सारांश’, ‘जन्म’, ‘नाम’, ‘काश’, यांसारख्या चित्रपटांची निर्मीती केली तसेच राज जिस्म, पाप, मर्डर, सारख्या बोल्ड चित्रपटांचेही त्यांनी दिग्दर्शन केले. त्यांचे पहिले लग्न लॉरेन ब्राइट या ब्रिटिश महिलसोबत झाले होते. ज्यांच्यापासून त्यांना राहुल भट्ट आणि पूजा भट्ट अशी दोन अपत्ये आहेत. काही वर्षानंतर ते वेगळे झाले आणि त्यांनी सोनी राजदानसोबत विवाह केला जिच्यापासून त्यांना शाहीन भट्ट आणि आलिया भट्ट अशी दोन अपत्ये झाली.

मुकेश भट्ट –  मुकेश भट्ट यांचा जन्म ५ जून १९५२ ला झाला होता. त्यांनी १९८९ पासून चित्रपट जगतात काम करण्यास सुरूवात केली होती. ‘जुर्म’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यांनी नीलिमा भट्ट यांच्याशी लग्न केले. त्यांना साक्षी आणि विशेष अशी दोन अपत्ये आहेत. ते त्यांच्या चित्रपटाप्रमाणेच विवादित वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.

तिसरी पिढी :

पूजा भट्ट – भट्ट परिवाराची तिसरी पिढी असलेली पूजा एक यशस्वी अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शक आहे. १९८९ मध्ये डेडी चित्रपटातून तिने अभिनय जगतात पाऊल ठेवले होते.  ‘सडक’, ‘जानम’, ‘चाहत’, ‘तमन्ना’ अशा चित्रपटात पूजाने काम केले आहे. तिने २००३ मध्ये मनीष मखीजासोबत लग्न केले होते. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. पूजा आणि आलिया दोघी सावत्र बहिणी आहेत.

आलिया भट्ट – अभिनेत्री आलिया भट्टचा जन्म १५ मार्च १९९३ ला झाला होता. आत्तापर्यंत तिने १७ हून अधिक चित्रपटात काम केले आहे. २०१२ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून तिने अभिनय कारकिर्दिला सुरूवात केली होती. आता ती रणबीर कपूरसोबत लग्न करुन कपूर घराण्याची सून होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा