अलीकडेच आयफा अवॉर्ड्स (IIFA Awards) पार पडले, ज्यामध्ये एकापेक्षा एक स्टार्सनी हजेरी लावली होती. या अवॉर्ड नाईटमध्ये तारकांचा मेळा जमला होता. या शोचे होस्टिंग सलमान खान (Salman Khan) करत होता, पण दरम्यान एका अभिनेत्रीने सलमान खानला ‘अंकल’ म्हटले आणि त्यानंतर अभिनेत्याने त्या अभिनेत्रीला थेट धमकीच दिली.
सारा म्हणाली ‘अंकल’
आयफा अवॉर्ड्सची रात्र अधिक रंजक बनवण्यासाठी सलमान खानने याचे होस्टिंग केले. त्याने रात्रभर लोकांचे मनोरंजन केले. पण या शोदरम्यान त्याला अशी अभिनेत्री भेटली, जी सर्वांसमोर त्याला ‘अंकल’ म्हणाली. ही दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) होती. (salman khan was called uncle by bollywood actress sara ali khan)
काय म्हणाला सलमान?
शो दरम्यान अभिनेत्री सारा अली खान देखील स्टेजवर पोहोचली आणि यावेळी तिने सलमानला भाई म्हणून हाक मारली. ज्यावर अभिनेत्याने तिला आठवण करून दिली की, तो तिच्या पालकांच्या बरोबरीचा आहे. यावर ती त्याला ‘अंकल’ म्हणते. तर सलमान म्हणतो की, आता ती कधीच त्याची हिरोईन होऊ शकत नाही. त्यानंतर सारा त्याला सलमान बॉस म्हणते, ज्यावर सलमान म्हणतो की, आता तिच्यासोबतचा चित्रपट पक्का झाला आहे.
साराचे आगामी चित्रपट
सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. विकीने लग्नानंतर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. लक्ष्मण उत्रेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










