Saturday, June 29, 2024

काय सांगता! ‘या’ हिट सिनेमांसाठी सलमान खान नव्हता पहिली पसंती

सध्याच्या घडीला बॉलिवूडमध्ये असा एक अभिनेता आहे, ज्याचा चित्रपट फ्लॉप जरी असला तरी १०० कोटी कमवणार हे सर्वांना माहिती आहे. तो अभिनेता ते बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान. सलमानने त्याच्या अभिनयाने आणि दमदार लुक्सने तुफान लोकप्रियता मिळवली. सलमान आणि सुपरहिट हे समीकरण बॉलिवूडमध्ये खूपच प्रसिद्ध झाले आहे. सलमानने आजपर्यत त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले. आजवरचा त्याचा प्रवास बघता तो खऱ्या अर्थाने बॉक्स ऑफिसचा किंग आहे. त्याच्या चित्रपटांचे यश बघता, प्रत्येक निर्माता दिग्दर्शकाला त्यांच्या चित्रपटांमध्ये सलमानच हवा आहे. आज सलमान सर्वच लोकांची पहिली पसंत बनला आहे. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल सुरूवातीच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलेला सलमान त्या चित्रपटांची पहिली पसंत नव्हता. त्याला दुसरी पसंत म्हणून सिनेमात घेण्यात आले होते. या लेखातून जाणून घेऊया अशाच काही सिनेमांची नावे.

मैंने प्यार किया :
ज्या सिनेमाने सलमानला बॉलिवूडमध्ये नाव, प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवून दिली त्याच सिनेमासाठी सलमान पहिली पसंत नव्हता. या सिनेमातून निरागस, रोमँटिक सलमान प्रेक्षकांसमोर आला. मात्र या सिनेमासाठी सलमान नाही तर दिपक तिजोरी पहिली पसंत होती. मात्र नंतर सूरज बडजात्या यांनी सलमानला या भूमिकेसाठी निवडले गेले.

करण-अर्जुन :
सलमान खान आणि शाहरुख खान यांचा ऑल टाईम हिट सिनेमा म्हणून ओळखला जाणारा हा सिनेमा सलमान आणि शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच आहे. राकेश रोशन यांच्या या सिनेमात त्यांना सलमानच्या भूमिकेसाठी अजय देवगण पाहिजे होता मात्र काही गणितं न जुळल्यामुळे ही भूमिका सलमानच्या झोळीत पडली.

कुछ कुछ होता है :
शाहरुख खान आणि काजोल यांचा सुपरहिट सिनेमा असलेल्या आणि करण जोहरचा पहिलाच दिग्दर्शकीय सिनेमा असलेल्या या चित्रपटामध्ये अमन ही सहाय्यक अभिनेत्याची भूमिका सलमान खानने केली. मात्र या भूमिकेसाठी देखील करणची पहिली पसंती सलमान नव्हता. त्याने अनेक अभिनेत्यांशी संपर्क केला मात्र सर्वांनी नकार दिल्यामुळे अखेर ही भूमिका सलमानने स्वतः केली.

वॉन्टेड :
ज्या चित्रपटाने सलमानला पुन्हा यश दाखवले त्या वॉन्टेडसाठी प्रभुदेवाने करणनाथ यांना घेण्याचे ठरवले होते, मात्र नंतर ही भूमिका सलमानला मिळाली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा