Monday, July 8, 2024

लय भारी! ‘बिग बॉस मराठी’च्या चावडीवर येणार ‘भाईजान’, म्हणाला, ‘ओ भाऊ…’

‘बिग बॉस मराठी’चे तिसरे पर्व चांगलेच गाजत आहे. या पर्वातील सगळे स्पर्धक, त्यांचा खेळ आणि घरातील त्यांच्या काही वैयक्तिक गोष्टी देखील चर्चेत आहेत. या शोमध्ये रोज नवनवीन वळणे येताना दिसत आहेत. या वर्षी दर वीकेंडला स्पर्धकांसाठी काहीतरी सरप्राईज दिली जातात. वीकेंडला कोणीतरी त्यांना भेटायला येत असतात. अशातच येत्या वीकेंडला घरातील स्पर्धकांना एक मोठे सरप्राईज मिळणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात सलमान खान घरातील स्पर्धकांना भेटायला येणार आहे. सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान सांगत आहे की, “मी येतोय बिग बॉस मराठीच्या चावडीवर. ओ भाऊ जरा चावडीवर या.” मागच्या वर्षी देखील सलमान खान बिग बॉसमध्ये आला होता. (Salman Khan will come to weekend of bigg Boss Marathi 3 )

मागील पर्वामध्ये सलमान खान आला होता, तेव्हा देखील त्याला बघून सगळे खुश झाले होते. आता देखील त्याला पुन्हा एकदा बघण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर देखील ‘बिग बॉस १५’मध्ये अंतिम चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी गेले होते. त्यामुळे आता सलमान खान देखील ‘बिग बॉस मराठी’मध्ये येणार आहे.

महेश मांजरेकर यांचा ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट येत्या ३ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे प्रमोशन सध्या जोरदार चालू आहे. त्यामुळे सर्वत्र या चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. हा चित्रपट मराठीमधील ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा रिमेक आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी सगळेच उत्साहित आहे. या चित्रपटातील काही गाणी नुकतेच प्रदर्शित झाली आहेत. मराठीमधील या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. मराठीमधील हा चित्रपट सुपरहिट झाला होता. त्यामुळे आता या चित्रपटाकडून देखील प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-असे काय घडले की, निलेश साबळे आणि टीमला मागावी लागली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची माफी

-कहरच! स्विमिंग पूलजवळ बसून रुचिराने दाखवली तिच्या हॉटनेसची झलक, एक नजर टाकाच

-अभिजीत बिचुकलेला कोरोनाची लागण, ‘बिग बॉस १५’ मध्ये न घेण्याचा निर्मात्यांचा निर्णय

हे देखील वाचा