अभिजीत बिचुकलेला कोरोनाची लागण, ‘बिग बॉस १५’ मध्ये न घेण्याचा निर्मात्यांचा निर्णय


‘बिग बॉस १५’ हा टेलिव्हिजनवरील सर्वात चर्चेत असणारा शो आहे. या शोमध्ये तीन वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहेत अशी बातमी आली होती. अशातच देवोलीना भट्टाचार्जी, रश्मी देसाई आणि अभिजीत बिचुकले येणार होते. परंतु त्यांची अजून एन्ट्री झाली नाही. हाती आलेल्या माहितीनुसार अभिजीत बिचुकले याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शोच्या निर्मात्यांनी त्याला शोमध्ये न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, बिग बॉसने अभिजीतला शोमधून बाहेर केले असून, तसेच रश्मी देसाई आणि देवोलीना भट्टाचार्जी यांना क्वारंटाइन केले आहे. तसेच आणखी एक अभिनेत्री आणि पूर्व बिग बॉस स्पर्धक या शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी ती देखील क्वारंटाइन आहे. (Bigg boss 15, wild card entry abhijeet bichukale tested covid 19 positive)

अभिजीतला राजकारणात विशेष रस आहे. देशाचे पंतप्रधान बनण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्याने २०१९ मध्ये सातारा विधानसभामध्ये अपक्ष उमेदवारी लढवली होती. ज्यात तो अतिशय वाईट पद्धतीने हारला. परंतु तरी देखील त्याचा आत्मविश्वास काही कमी झाला नाही. त्याला देशातील सगळ्या निवडणुका लढायच्या आहेत.

तसे पाहायला गेलं तर अभिजीत बिचुकले एक मजेशीर व्यक्ती आहे. त्यामुळे अनेकांना तो आवडतो. हिंदी बिग बॉसमध्ये आल्यावर तो खूप हंगामा करणार यात काही वादच नाही. जेव्हा सलमान खान ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आला होता, तेव्हाच त्याने अभिजित बिचुकलेला सांगितले होते की, तो त्याला ‘बिग बॉस १५’ मध्ये घेणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, राखी सावंत या शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार आहे. परंतु याबाबत अजूनही कोणती अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र राखीने इंस्टाग्रामवर जी पोस्ट केली आहे त्यावरून असे समजत आहे की, ही बातमी खरी आहे. ही बातमी ऐकून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

राखी सावंत ही मनोरंजनाचा धमाका आहे. याची झलक तिने आधी देखील ‘बिग बॉस’ मध्ये दाखवली आहे. ‘बिग बॉस १४’ मध्ये देखील राखी सावंत होती. ती या शोमध्ये शेवटपर्यंत गेली होती. या पर्वातून तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे आता या शोमध्ये देखील ती जबरबस्त मनोरंजन करणार आहे. राखीने सोशल मीडियावर सलमान खानसोबत फोटो शेअर केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

काय सांगता! चक्क आमिर खानने मागितली केजीफ स्टार यशची माफी

मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटावर मुलगा अरहानची ‘अशी’ होती प्रतिक्रिया

अरे वा! ‘मोनिशा’ आणि ‘अनुपमा’ची झाली भेट, या भेटीचा भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल


Latest Post

error: Content is protected !!