बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. मात्र, याबाबत सर्वात महत्त्वाची प्रतिक्रिया आली आहे, ती म्हणजे बॉलिवूडचे दिग्गज लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान यांची.
त्यांनी म्हटले आहे की, राधे हा चांगला चित्रपट नाहीये. यासाठी त्यांनी या चित्रपटाच्या लेखकाला जबाबदार ठरवले आहे. कदाचित या वक्तव्यामुळे सलमान खानचेही मन तुटेल. सलीम यांनी ‘दबंग 3’ ला एक वेगळा आणि ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाला चांगला चित्रपट म्हटले आहे. सलमान खान आणि दिशा पटानी यांचा राधे हा चित्रपट 13 मेला म्हणजेच ईदच्या दिवशी प्रदर्शित झाला होता.
या चित्रपटाला आयएमडीबीवर 10 पैकी 1.7 एवढे रेटिंग दिले आहे. सलमान खानचा हा सर्वात कमी रेटिंगवाला चित्रपट आहे. याआधी देखील जेव्हा 2018 मध्ये त्याचा ‘रेस 3’ हा चित्रपट आला होता, तेव्हा त्याला 1.9 एवढे रेटिंग मिळाले होते. सलीम खान यांनी दैनिक भास्करला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, या आधी ‘दबंग 3’ हा एक वेगळा चित्रपट होता.
त्यांनी पुढे सांगितले की, “बजरंगी भाईजान हा खूप छान आणि वेगळा चित्रपट होता. राधे हा अजिबात चांगला चित्रपट नाहीये. परंतु कमर्शिअल चित्रपटाची ही जबाबदारी आहे की, प्रत्येक व्यक्तीला पैसे मिळतील. कलाकारापासून निर्माता, डिस्ट्रीब्यूटर्स, एक्सबिटर्स आणि प्रत्येक स्टॅक होल्डरला पैसे मिळाले पाहिजे. चित्रपट विकत घेणाऱ्याला पैसे मिळाले पाहिजे. यामुळे चित्रपट निर्मिती आणि व्यापार याचे चक्र चालू राहते. या आधारावर सलमान खानने अभिनय केला आहे. या चित्रपटाच्या स्टॅक होल्डरला फायदा झाला आहे. नाहीतर हा चित्रपट एवढा काही खास नाहीये.”
सलीम खान यांनी बॉलिवूडमधील लेखकांबद्दल देखील भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले की, “चित्रपटसृष्टीतील एक सर्वात मोठी अडचण आहे की, इथे चांगले लेखक नाहीयेत. याचे कारण म्हणजे लेखक हिंदी आणि उर्दूमधील साहित्य वाचत नाहीत. ते बाहेर काहीही बघतात आणि त्याचे भारतीयकरण करण्याचा प्रयत्न करतात. ‘जंजीर’ हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील गेम चेंगर चित्रपट होता. या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीला योग्य मार्गावर आणले आहे. यांनतर इंडस्ट्रीमध्ये जावेद- सलीम याला रेप्लेसमेंट नाही मिळाली. यामध्ये आता सलमान काय करू शकतो??”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…