Wednesday, July 3, 2024

वाढलेले वजन सलमान खानसाठी बनले समस्या, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं जोरदार ट्रोल

बॉलिवूड स्टार्सना जेवढे प्रेम मिळते, तेवढेच त्यांना त्यांच्या परफेक्ट बॉडी आणि स्टाइलवर लक्ष केंद्रित करावे लागते. नाहीतर छोट्याशा चुकीमुळे कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. असाच काहीसा प्रकार सलमान खानसोबत (Salman Khan) घडला, जेव्हा एका व्हिडिओमध्ये त्याचे बाहेर आलेले पोट दिसत होते. या व्हिडिओमध्ये सलमान खान त्याच्या ब्लॉकबस्टर हिट चित्रपट ‘दबंग’मधील चार्टबस्टर नंबर ‘पांडेजी सीटी’ वर थिरकताना दिसत आहे.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये सलमान खानचे वाढलेले पोट पाहून, नेटकऱ्यांनी त्याला जोरदार ट्रोल केले. इंटरनेटवर समोर आलेला हा एक जुना व्हिडिओ आहे, ज्यामध्ये अभिनेता नुकत्याच संपलेल्या ‘दबंग टूर’साठी बॅक डान्सर्ससोबत डान्स स्टेप्सची तालीम करताना दिसत आहे. (salman khans increased weight becomes trouble trolls are getting fiercely related to belly)

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
हिट ट्रॅकच्या हुक स्टेप्स करताना, तो काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. सलमानच्या डान्स मूव्ह्ज ऑन-पॉइंट असताना, नेटकऱ्यांना त्याचे वाढलेले पोट दिसत होते. अनेक सोशल मीडिया युजर्स म्हणाले की, सुपरस्टारकडे एक वाढलेले ‘पोट’ आहे, जे लपवण्यात तो पटाईत आहे. दरम्यान अनेकांनी त्याच्या शेवटच्या चित्रपट ‘अंतीम: द फायनल ट्रुथ’मध्ये त्याच्या ८ पॅक ऍब्सवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस
युजर्स या व्हिडिओवर कमेंट करत लिहित आहेत, “पोट बाहेर आलं आहे.” तर दुसऱ्याने लिहिले, “सोलोमन बोईने असे काय केले की ८ पॅक गायब झाले.” एका युजरने आश्चर्य व्यक्त केले आणि लिहिले, “ओएमजी त्याचे पोट”, तर दुसऱ्याने लिहिले, “भाईचे पॅक फॅमिली पॅक झाले आहेत.”

तसेच, कामाबद्दल सांगायचे झाले, तर तो नुकताच ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’मध्ये आयुष शर्मा, महिमा मकवाना, महेश मांजरेकर यांच्यासोबत दिसला. चित्रपटात सलमान पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला, तर आयुषला गँगस्टरच्या भूमिकेत चांगलीच पसंती मिळाली.

हेही वाचा :

मायरा वैकुळने ‘केळेवाली’ गाण्यावर केला असा डान्स की, सोनाली कुलकर्णीने देखील केली भन्नाट कमेंट

विवाहित असून पवन सिंग करत होता एक्स गर्लफ्रेंडसोबत रिलेशनमध्ये राहण्याची इच्छा व्यक्त, विवादात होती गायकाची लव्हलाईफ

जेव्हा दीपिका पदुकोणला वाटायचं, ‘आयुष्य नाही महत्त्वाचं’, डिप्रेशनच्या दिवसाबाबत अभिनेत्रीने केला खुलासा

हे देखील वाचा