Monday, March 23, 2026
Home बॉलीवूड सलमान खानच्या ‘राधे’चा परदेशातही डंका! पहिल्याच दिवशी चित्रपटाने केली बक्कळ कमाई; ओटीटीवरही मिळाला भरभरून प्रतिसाद

सलमान खानच्या ‘राधे’चा परदेशातही डंका! पहिल्याच दिवशी चित्रपटाने केली बक्कळ कमाई; ओटीटीवरही मिळाला भरभरून प्रतिसाद

जवळपास एक वर्षापासून प्रेक्षक ज्या चित्रपटाची वाट पाहत आहेत, तो चित्रपट म्हणजे ‘राधे: द योर वॉंटेड भाई.’ सलमान खानचा हा बहुचर्चित चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. भारतात तर हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित नाही झाला, पण परदेशात सलमान खानचा दम प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. भारतात हा चित्रपट दुपारी 12 वाजल्यापासून झी5 ऍपवर जवळपास 1.5 मिलियन प्रेक्षकांनी पाहिला आहे.

सलमान खानच्या या चित्रपटाची जादू यूएई आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये चांगलीच पाहायला मिळाली आहे. सलमान खानच्या या चित्रपटाने परदेशात देखील धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 40 लाख डॉलर म्हणजेच 2.94 कोटी एवढी कमाई केली आहे. आता सर्वजण वीकेंडची वाट पाहत आहेत. कारण हा चित्रपट वीकेंडला मोठ्या संख्येने पाहिला जाईल अशी सर्वांना खात्री आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार झी ने सॅटेलाईट, डिजिटल आणि थिएटर अधिकारासाठी जवळपास 230 कोटींची डील केली आहे. राधे चित्रपटाचे निर्माते आणि झीमध्ये 40 कोटी रुपये कमी करण्यासाठी तयार झाले होते.

या चित्रपटा रिव्ह्यूनुसार, एका युजरने फाईव स्टार देऊन म्हटले की, “राधे एका शब्दात सांगायचा‌ झाल्यास ब्लॉकबस्टर चित्रपट आहे.”

चित्रपटाचा वेळ, मजबूत प्लॉट आणि परफेक्ट कॉमिक टायमिंग या सगळ्याचा विचार केला, तर हा सलमान खानचा आतापर्यंतचा सर्वात बेस्ट चित्रपट आहे. हा चित्रपट दुबईमध्ये देखील प्रदर्शित झाला आहे. ईदच्या निमित्ताने हा चित्रपट बघितल्यावर अनेक प्रेक्षक सोशल मीडियावर कमेंट करून सलमान खानचे कौतुक करत आहे. तसेच या चित्रपटातील गाण्यांना देखील चाहते खूप चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ईद मुबारक! ‘संजू बाबा’ने कुटुंबासोबत दुबईत साजरी केली ईद, पत्नी मान्यताने फोटो केले शेअर

-व्वा… अतिसुंदर! दानिश मोहम्मदने ‘इंडियन आयडल १२’ शोच्या सेटवरच साजरी केली ईद, कोरोना निघून जाण्यासाठीही केली प्रार्थना

हे देखील वाचा