बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा ‘राधे : योर मोस्ट वाँटेड भाई’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. अगदी दोन दिवसातच या चित्रपटाची चांगलीच कमाई झालेली दिसत आहे. सलमान खानचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर तसेच परदेशात चित्रपट गृहात प्रदर्शित झाला आहे. यामध्येच सलमान खानचा एक थ्रो बॅक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान पत्रकार परिषदेत उभा राहून डान्स करताना दिसत आहे. हे सगळं बघून कॅटरिना कैफ मोठ मोठ्याने हसत आहे.
या व्हिडिओमध्ये सलमान खान फ्लॉस चॅलेंज स्वीकारून जबरदस्त डान्स मूव्ह्ज करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सर्वात मजेदार कॅटरिना कैफचे हावभाव आहे. सलमान खानचा डान्स बघून ती खूप हसत असते. तर सलमान खान बिनधास्त डान्स स्टेप्स करताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये कॅटरिना कैफ खुर्चीवर बसलेली आहे. तर सलमान खान तिच्या मागे त्याच्याच अंदाजात डान्स करताना दिसत आहे. सलमान खान आणि कॅटरीना कैफ यांची जोडी सर्वांना खूप आवडते. त्यांच्या जोडीला सगळे खूप प्रेम देतात. त्या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. तसेच ते नात्यात असल्याचेही बोलले जात होते. पुढे त्यांचे ब्रेकअप झाल्याचेही वृत्त आले होते. सध्या कॅटरिनाचे नाव विकी कौशलबरोबर घेतले जाते.
सलमान खान आणि कॅटरीना कैफच्या या व्हिडिओला विरल भयानीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट वरून शेअर केला आहे. या व्हिडिओला अनेकांनी प्रतिक्रिया देत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखापेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच हा व्हिडिओ पाहून समजते की, सलमान खान पत्रकार परिषदेत डान्स करत आहे.
सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो ‘किक 2’ आणि ‘टायगर 3’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच तो आमिर खान आणि करीना कपूरचा ‘लाल चड्डा सिंग’च्या चित्रपटात देखील दिसणार आहे. तसेच कॅटरिना कैफबद्दल बोलायचे झाल्यास, ती ‘फोन भूत’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच सलमान खान आणि कॅटरीना कैफ ‘टायगर 3’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे.
हेही वाचा-
–वाढदिवशी विकी कौशलचा जुना व्हिडिओ व्हायरल; साऊथ इंडियन लूकमध्ये अभिनेत्याने केली मजेशीर ऍक्टिंग
–जाळ आणि धुर संगट! तीन तासांत दहा लाख हिट्स आणि हजारो कमेंट्स, पाहा खेसारीलाल यादवचं होळीगीत










