Thursday, April 18, 2024

तरुणींच्या गळ्यातील ताईत सनम पुरी अडकला लग्नबंधनात, एक वर्षांपूर्वीच केला होता साखरपुडा

‘इश्क बुलावा फेम’ गायक सनम पुरीने गर्लफ्रेंड जुकोबेनी टुंगो सोबत पंजाबी पद्धतीने लग्न केले आहे. इश्क बुलावा, फकीरा यासारखे प्रसिद्ध गाणे त्याने गायले आहे. सोशल मीडिया वर सनम पुरीच्या लग्नाचे वीडिओ वायरल होत आहेत.

सनम पुरीने ‘हंसी तो फंसी’ (Hasee toh phasee) या सिनेमातील प्रसिद्ध गाणे ‘इश्क बुलावा'(Ishq bulaava), ‘स्टूडेंट ऑफ द ईयर 2’ (Student of the year2) चा ‘फकीरा’ हा टायटल ट्रॅक याबरोबरच अनेक सुपरहिट गाणे गायले आहे. एवढेच नाही तर अनेक जुन्या सुपरहिट गाण्यांचे धमाकेदार रीमेकही खुप प्रसिद्ध आहे. सनम (Saman puri) फक्त गायकच नाही तर संगीतकारही आहे. ‘सनम’ या पॅाप-रॅाक बॅंडचा (Indian pop rock band) तो एक भाग आहे. ‘सनम’ या पॅाप-रॅाक बॅंडने आज पर्यंत अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. गायक व संगीतकार सनमने त्याची गर्लफ्रेंड जुकोबेनी टुंगो (Zuchobeni Tungoe) सोबत नागालॅंडमध्ये लग्न केले. गेल्या वर्षी ११ मार्चला सनम पुरी आणि त्याची गर्लफ्रेंड जुकोबेनी टुंगो यांनी साखरपुडा केला होता.

पंजाबी आणि नागा परंपरेने लग्न
माध्यमांशी बोलताना सनम म्हणला, “मी किती खुष आहे हे मी शब्दांत सांगु शकत नाही. मला नेहमी वाटायच त्याच पद्धतीने हे लग्न झालं. आमच्यातलं नातं हे मी शब्दात सांगु शकत नाही.आम्ही आता नवी सुरवात करण्यासाठी उत्सुक आहोत. लग्नाबद्दल बोलतांना सनम म्हणाला आम्ही पंजाबी आणि नागा दोन्ही परंपरेने लग्न केले.

सनम पुरीचं आणि गर्लफ्रेंड जुकोबेनी टुंगोचा वेडिंग लुक
गेल्या वर्षी ११ मार्चला सनम पुरी आणि त्याची गर्लफ्रेंड जुकोबेनी टुंगो यांनी साखरपुडा केला होता. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थीतीत नागालॅंड मध्ये ११ जानेवारीला सनम आणि जुकोबेनी टुंगो यांनी पारंपरीक पद्धतीने लग्न केेले. यावेळी जुकोबेनी पांढऱ्या वेडिंग गाऊनमध्ये होती तर सनम ब्लॅक कलरच्या टक्सीडोमध्ये दिसुन आला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’ चित्रपटाचा पोस्टर समोर, तेजस्विनी पंडितच्या करारी लूकने वेधले लक्ष
सनी लिओनीने लाॅंच केला तिचा एआय अवतार, बनली भारताची पहिली AI रेप्लिका असणारी बॉलिवूड अभिनेत्री

 

 

 

हे देखील वाचा