अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही सध्या जोरदार चर्चेत आहे. नुकतेच तिने तिचा पती नागा चैतन्यपासून वेगळी होण्याचा निर्णय घेतला आहे. तिने सोशल मीडियावर देखील पोस्ट करून तिच्या चाहत्यांना ही बातमी दिली होती. त्यानंतर त्यांच्याबाबत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. एवढंच काय, तर अनेक अफवा देखील पसरल्या आहेत.
तिने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिले होते की, “खूप विचार केल्यानंतर नागा चैतन्य आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की, दहा वर्षांपेक्षाही जास्त आमची मैत्री टिकली, जी आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे. आमच्यामध्ये एक खास नाते आहे.”
https://www.instagram.com/p/CUhawZvrPK9/?utm_source=ig_web_copy_link
यासोबत त्यांच्या घटस्फोटाबाबत अनेक अफवा पसरत होत्या. यावर तिने सगळ्यांना उत्तर दिले आहे. तिने तिचे अफेअर, गर्भपात याबाबत समोर येणाऱ्या सगळ्या गोष्टींचा खुलासा केला. तसेच या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत, हे देखील तिने सांगितले आहे. या सगळ्या अफवाबद्दल तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून उत्तर दिले आहे. (Samanatha Ruth Prabhu slams rumours of affairs they says I had affairs abortions)
समंथाने इंस्टाग्रामवर लिहिले आहे की, “माझ्या संकटात तुम्ही मला भावनिकदृष्ट्या खूप आधार दिला. तुम्ही माझ्याप्रती प्रेम, सहानभूती, चिंता आणि खोट्या अफवा आणि गोष्टींनी माझ्याविरुद्ध माझी रक्षा केल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. जे माझ्याबाबत या सगळ्या अफवा पसरवत आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की, माझे अफेअर चालू होते. मला मुलं नको होती. एवढंच नाही, तर मी गर्भपात केला होता या अफवा पसरत आहेत. घटस्फोट होणं ही एक दुःखदायक प्रक्रिया आहे. यातून बाहेर येण्यासाठी मला काही काळ एकटे सोडा. माझ्यावर वैयक्तिक चर्चा चालूच आहेत. मात्र, मी एवढेच सांगते, मला कितीही पाडण्याचा प्रयत्न करा मी पडणार नाही.”
समंथाने सहा दिवस आधी इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून ते दोघे वेगळे होत असल्याची माहिती दिली होती. तिचा हा निर्णय ऐकून तिच्या सगळ्याच चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अभिनेते अनुपम खेर यांनी हिंदू धर्माबद्दल केले मोठे वक्तव्य; म्हणाले, ‘हिंदू असणे हे जीवन…’
-मोठी घडामोड! एकीकडे जामीन अर्जावर सुनावणी सुरु असतानाच आर्यन खानची आर्थर रोड कारागृहात रवानगी
-आर्यनचे वकील मानेशिंदेंचे मोठे वक्तव्य; म्हणाले, आर्यनला ‘ग्लॅमरचा तडका’ लावण्यासाठी…