Monday, June 9, 2025
Home साऊथ सिनेमा समंथा अन् नागा चैतन्यच्या वैवाहिक जीवनात कटुता, विवाह समुपदेशकाची भेट घेतल्याच्या चर्चांना उधाण

समंथा अन् नागा चैतन्यच्या वैवाहिक जीवनात कटुता, विवाह समुपदेशकाची भेट घेतल्याच्या चर्चांना उधाण

प्रसिद्ध दक्षिण अभिनेत्री समंथा अक्किनेनी आणि सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य यांचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. दोघेही दक्षिण भारतीय इंडस्ट्रीचे क्यूट जोडपे मानले जातात. मात्र, आता असे वृत्त आहे की, आता दोघांच्या वैवाहिक आयुष्यात कटुता आली आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांनीही विवाह समुपदेशकाची भेट घेतल्याची बातमी समोर आली आहे.

काय आहे घटस्फोटाचे कारण?
माध्यमांतील वृत्तानुसार, दोघे घटस्फोट घेणार आहेत. यामागचे कारण आहे नागा चैतन्यचे कुटुंब नियोजन. खरं तर, नागाची इच्छा आहे की, समंथाने काही काळ चित्रपट करणे थांबवावे आणि कुटुंब पुढे वाढवावे. दुसरीकडे, समंथा तिच्या कारकिर्दीत चांगली कामगिरी करत आहे आणि सध्या ती सोडायला तयार नाही. मात्र, या अहवालांमध्ये किती सत्यता आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

सध्या, इंडस्ट्रीमध्ये या बातमीने जोर धरला आहे की, समंथा आणि नागा चैतन्य यांनी त्यांचे मतभेद दूर करण्यासाठी विवाह समुपदेशकाची भेट घेतली आहे. समंथा, नागाच्या घटस्फोटाच्या अफवा गेल्या काही काळापासून चर्चेत होत्या. परंतु अक्किनेनी कुटुंबाने आतापर्यंत कोणत्याही बातमीवर प्रतिक्रिया दिलेली नाही.

https://www.instagram.com/p/CF_MKk0hj6P/?utm_source=ig_web_copy_link

घटस्फोटाची बातमी कशी पसरली?
लग्नानंतर, समंथाने तिच्या नावापुढे अक्किनेनी आडनाव सोशल मीडिया अकाऊंटवर ठेवले होते, जे नागा चैतन्यचे आहे. ती सोशल मीडियावर नागासोबतचे फोटो अनेक वेळा शेअर करते. परंतु नागा सोशल मीडियावर तितका सक्रिय नाही. जेव्हापासून तिने तिचे अडनाव काढून टाकले, तेव्हापासून लोकांच्या मनात समंथा आणि नागा चैतन्य यांच्यातील संबंधाबद्दल विविध प्रश्न निर्माण होत आहेत.

अभिनेता नागा चैतन्यशी लग्न करण्यापूर्वी समंथा ‘रंग दे बसंती’ या चित्रपटातील अभिनेता सिद्धार्थच्या प्रेमात होती. समंथा त्याच्याशी लग्न करण्यासही तयार होती. परंतु त्यांचे अचानक ब्रेकअप झाले. समंथा सिद्धार्थबद्दल खूप गंभीर होती, पण त्याच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर काही दिवसांनी समंथाने नागा चैतन्यशी लग्न केले. हे लग्न खूप धूमधडाक्यात पार पडले.

टॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक असलेल्या समंथा रूथ प्रभूला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. ती तिच्या बोल्ड आणि बिनधास्त शैलीसाठी ओळखली जाते. त्याचबरोबर समंथा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. नागा चैतन्यचे पूर्ण नाव नागा चैतन्य अक्किनेनी आहे. हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाहरुख खानने लाँच केले रितेश अन् जिनिलियाचे ‘प्लांट बेस्ड मीट व्हेंचर’, मजेशीर ट्वीट चर्चेत

-रजनीकांत यांची ऑनस्क्रीन पत्नी बनून चर्चेत आली होती श्रिया सरन; शॉर्ट ड्रेसमुळे मागावी लागली माफी

-काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! चिरंजीवीचा भाचा अन् अभिनेता साई धरम तेजचा अपघात; आता कशीय तब्येत?

हे देखील वाचा