सुपरस्टार नागार्जुनची सून समंथाने कुत्र्यासोबत मस्ती करतानाचा व्हिडिओ केला शेअर, म्हणाली, ‘माझा गुड बॉय आणि…’


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार नागार्जुनची सून आणि अभिनेत्री समंथा अक्किनेनी ही तिची वेबसीरिज ‘फॅमिली मॅन 2’ नंतर खूप चर्चेत आली आहे. यातच ती आजकाल सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असल्याचे दिसत आहे. तिचे सोशल मीडियावर 17.5 मिलियनपेक्षाही जास्त फॉलोवर्स आहेत. सध्या तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. नुकताच तिचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती गार्डनमध्ये तिच्या कुत्र्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. ते दोघे फुग्यासोबत खेळत आहेत. समंथा हे सगळं एन्जॉय करताना दिसत आहे.

समंथाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “माझा गुड बॉय आणि त्याचे फुग्याचे निरीक्षण.” या सोबतच तिने हॅशटॅग दिले आहे की, “hydrabadwheatherisxox.” यावरून आपण अंदाज लावू शकतो की, हैद्राबादमधील वातावरण एकदम चांगले आहे.

तिने शेअर केलेल्या या व्हिडिओला दोन दिवसातच 9.9 मिलियनपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच 1.6 मिलियनपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. तिचे चाहते सातत्याने या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. त्या दोघांमधील क्यूट मस्ती प्रेक्षकांना खूप आवडली आहे. तिचा कुत्रा फुग्यासोबत उड्या मारत खेळताना दिसत आहे. तसेच समंथा देखील त्यांचा हा खेळ एन्जॉय करत आहे. हे तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे. (Samantha Akkineni share a video with her dog, while playing with balloons in garden)

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘द फॅमिली मॅन 2’ मध्ये ‘राजी’ची भूमिका साकारणारी समंथा अक्किनेनी ही तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये ती खूपच सिंपल दिसत आहे. तिच्या या लूककडे प्रेक्षक खूप आकर्षित झाले होते. तिच्या यामधील अदा पाहण्याजोग्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हिडिओ: ‘पवित्र रिश्ता २’मधील मानवच्या अर्चनाने केली कोरोनाची पहिली चाचणी; म्हणाली, ‘आजपर्यंत कोरोनाची…’

-‘बचपन का प्यार मेरा भूल ना जाना…’, ‘देवमाणूस’मधल्या टोन्याचं प्रेमप्रकरण आलं समोर; मजेदार व्हिडिओ व्हायरल

-आदिल खानसोबत जोरदार ठुमके लावताना दिसली शिल्पा शेट्टी; ‘चुरा के दिल मेरा’ गाण्यावरचा धमाल परफोर्मेंस होतोय व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.