व्हिडिओ: ‘पवित्र रिश्ता २’मधील मानवच्या अर्चनाने केली कोरोनाची पहिली चाचणी; म्हणाली, ‘आजपर्यंत कोरोनाची…’


सन २००९ मध्ये एका टीव्ही मालिकेने एन्ट्री केली होती. तब्बल ५ वर्षे चाललेली ही मालिका घराघरात पोहोचली. या मालिकेसोबतच कलाकारांनाही जबरदस्त प्रसिद्धी मिळाली. ही मालिका म्हणजेच ‘पवित्र रिश्ता’ होय. या मालिकेच्या पहिल्या सिझनला मिळालेल्या यशानंतर आता याचा दुसरा सिझनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पवित्र रिश्ता २ची शूटिंगदेखील सुरू झाली आहे. अशामध्ये सर्व कलाकार शूटिंगमध्ये व्यस्त असून उत्साही आहेत. दरम्यान कोरोना व्हायरसमुळे आपापली काळजीही घेत आहेत. यामध्येच आता प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे कोरोना चाचणी करताना दिसली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

अंकिताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ‘पवित्र रिश्ता २’च्या सेटवरील हा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच तिने अनुभवही शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, अंकिता कोरोनाची चाचणी करते. व्हिडिओमध्ये ती म्हणते की, तिने आजपर्यंत कोरोनाची चाचणी केली नाही. कारण तिला गरज नाही पडली. (Actress Ankita Lokhande Got Her First Covid Test Done On Sets of Pavitra Rishta 2)

दुसरीकडे कोरोनामुळे शोच्या सेटवरही सर्व सुरक्षेची काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे सर्व कलाकारांची कोरोना चाचणी केली जात आहे.

हा व्हिडिओ शेअर करत अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले की, “#पवित्ररिश्ताच्या सेटवर माझी पहिली कोरोना चाचणी. माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली.”

युजर देतायत भन्नाट प्रतिक्रिया
अंकिताच्या या व्हिडिओवर चाहते भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. अनेक युजर्स आहेत, ज्यांना अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ‘पवित्र रिश्ता २’ची शूटिंग आवडत नाहीये. चाहते आजही ‘मानव’च्या भूमिकेत सुशांतलाच पाहत आहेत. त्याच्या जागी शाहीर शेखला चाहते पाहून शकत नाहीयेत. एका युजरने म्हटले आहे की, “तुझं मन तरी कसं होतंय सुशांतविना शोमध्ये काम करण्याचे. आम्ही हा शो नाही पाहणार.”

दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच शोच्या सेटवरील फोटो समोर आला होता, ज्यात अंकिता लोखंडे ‘अर्चना’ आणि शाहीर शेख ‘मानव’च्या भूमिकेत झळकले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्विमिंग पूलच्या कडेला मोनालिसाने दिल्या घायाळ करणाऱ्या पोझ; पाहून वाढतील तुमच्याही हृदयाचे ठोके

-शुभमंगल सावधान!!! राहुल वैद्य आणि दिशा परमार अडकले विवाहबंधनात; लग्नसोहळ्याचे खास फोटो आले समोर

-आदिल खानसोबत जोरदार ठुमके लावताना दिसली शिल्पा शेट्टी; ‘चुरा के दिल मेरा’ गाण्यावरचा धमाल परफोर्मेंस होतोय व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.