Saturday, June 29, 2024

समांथाच्या आजाराबद्दल समजताच नागा चैतन्याच्या भावानं दिलं पाठिंबा; म्हणाला,’तुला खूप सारं प्रेम…’

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू(Samantha Ruth Prabhu) तिच्या जबरदस्त अभिनयामुळे चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. त्याच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. दरम्यान, समंथाची तब्येत थोडी खराब आहे आणि ती एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. जेव्हा समांथाने उघड केले की तिला मायोसिटिस आजार झालं आहे. तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून ती समंथाचा पूर्वाश्रमीचा पती नाग चैतन्यच्या कुटुंबातील एका सदस्याने तिच्यासाठी पोस्ट लिहिली आहे. मात्र आता समंथाचा पूर्वाश्रमीचा पती नाग चैतन्यच्या कुटुंबातील एका सदस्याने तिच्यासाठी पोस्ट लिहिली आहे.

नागार्जुन यांचा दुसरा मुलगा आणि नाग चैतन्यचा भाऊ अखिल अक्कीनेनी याने समंथासाठी पोस्ट लिहिली आहे. ‘प्रिय सॅम, तुला खूप सारं प्रेम आणि परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी शक्ती मिळो’, अशी पोस्ट अखिलने लिहिली. समंथाला बॉलिवूडमधूनही बरीच साथ मिळाली आहे. कियारा अडवाणी, कृती सनॉन, जान्हवी कपूर, राशी खन्ना, वरूण धवन यांसारख्या कलाकारांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत लवकर बरी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या ‘यशोदा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला तुम्ही फार चांगला प्रतिसाद दिला आहे. अशा परिस्थितीत समांथाने पोस्ट शेअर करताना प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ती लिहिते, ‘यशोदाच्या ट्रेलरला तुमचा प्रतिसाद जबरदस्त होता. मी हेच प्रेम आणि कनेक्शन मी तुमच्या सर्वांशी शेअर करते. तुमचं सर्वांच हेच प्रेम माझ्या जीवण्यात येणाऱ्या सर्व आव्हानांना तोंड देण्याचे सामर्थ्य देते.

सामंथा पुढे लिहिते, ‘काही महिन्यांपूर्वी मला मायोसायटिस नावाचा एक ऑटोइम्यून आजाराचं निदान झालं आहे. मला सुरुवातीला वाटलं होतं की हा आजार लवकरच बरा होईल आणि मी लवकर ठीक होईन, मला जास्त त्रासही होणार नाही. पण आता अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत आहे. मला हळूहळू जाणवतंय की, नेहमीच मी मजबूत आहे खंबीर आहे असं दाखवण्याची काहीच गरज नाही. ही गोष्ट स्वीकारणं एखाद्या संघर्षापेक्षा कमी नाही. डॉक्टरांना विश्वास आहे की मी लवकरच ठीक होईन. मी शारीरिक आणि मानसिकरित्या चांगल्या आणि वाईट दिवसांचा अनुभव घेत आहे. जेव्हा वाटतं की आता हे आणखी एक क्षणही सहन करू शकत नाही तेव्हा क्षण निघूनही जातो. याचा अर्थ असाच आहे की मी ठीक होण्याच्या जवळपास आहे. खूप सारं प्रेम…”

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
असे काय घडले की, अमिताभ बच्चन यांनी काढले बूट अन् चाहत्यासमाेर जाेडले हात

हुमा कुरेशी अन् मुदस्सर अजीज झाले वेगळे, तीन वर्षांपासून एकमेकांना करत होते डेट

हे देखील वाचा