Thursday, March 28, 2024

समंथा अन् नागा चैतन्य पुन्हा येणार एकत्र? अभिनेत्रीच्या वडिलांनी म्हटले, ‘चला नवीन सुरुवात करू’

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी साऊथ इंडस्ट्रीतून धक्कादायक बातमी समोर आली होती. ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाची. जोडप्याने त्यांच्या घटस्फोटाची घोषणा करत कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबतच चाहत्यांनाही मोठा धक्का दिला होता. आता दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे जाताना दिसतायेत. मात्र, अभिनेत्रीचे वडील जोसेफ प्रभू हे अजूनही त्यांच्या मुलीच्या घटस्फोटाच्या दु:खातून बाहेर आले नाहीयेत. त्यांनी यावर मन मोकळे केले आहे.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिचे वडील जोसेफ प्रभू (Joseph Prabhu) यांनी फेसबुकवर एक्स जावई नागा चैतन्य (Naga Chaitanya) याच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले आहे की, “खूप काळापूर्वी एक कहाणी होती, जी आता राहिली नाहीये. चला आता एक नवीन कहाणी आणि एक नवीन अध्याय सुरू करूया.”

समंथाच्या वडिलांची पोस्ट वाचून तिचे चाहतेही खूप भावूक झाले. त्यांना आपल्या लेकीच्या घटस्फोटामुळे आयुष्यात ज्या गोष्टींचा सामना करावा लागला, त्याबद्दल सर्वजण त्यांना सहानुभूती देत त्यांना धीर देताना दिसले. जोसेफ यांनी कुटुंबीयांचे दु:ख समजून घेतल्याबद्दल चाहत्यांना धन्यवादही दिला आहे. त्यांनी म्हटले की, “तुम्हा सर्वांच्या भावनांसाठी खूप खूप धन्यवाद. यातून बाहेर येण्यासाठी मी खूप काळ बसून राहिलो. मात्र, असेच बसून राहण्यासाठी आयुष्य खूप छोटे आहे.”

नागा चैतन्यसोबतच्या नात्यावर काय म्हणालेली समंथा
‘कॉफी विथ करण 7’ शोमध्ये सामील झाल्यानंतर समंथाने नागासोबतच्या आपल्या नात्यावर चर्चा केली होती. त्यांचे नाते खूपच खराब झाल्याचे तिने सांगितलेले. ती म्हणाली होती की, जर तिला आणि नागाला एका खोलीत बंद केले गेले, तर तिथे कोणतेही हत्यार नसले पाहिजे. तिने नागाकडून 250 कोटींच्या पोटगीसाठीही नकार दिला होता.

समंथाच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर ती शेवटची 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘काथू वाकुला रेंदू कधळ’ (Kaathu Vaakula Rendu Kadhal) या सिनेमात झळकली होती. तिच्या आगामी सिनेमांमध्ये ‘यशोदा’, ‘शकुंतलम’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘मी फक्त एवढंच सांगू शकते…’, राजूच्या तब्येतीबद्दल पत्नीने दिली महत्त्वाची अपडेट
‘या’ अभिनेत्रीने बिकिनी घालून ट्रेनरसोबत केला जबरदस्त योगा; नेटकरीही म्हणाले, ‘उद्या घटस्फोट फिक्स’
रिषभचा पत्ता कट! उर्वशी रौतेला झालीय ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेमात वेडी?

हे देखील वाचा