Wednesday, February 21, 2024

छत्रपती शिवरायांवर आधारित ‘या’ सिनेमावर बंदी घालण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराच यांचे वंशज संभाजीराजे यांनी ‘हर हर महादेव’ या सिनेमावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी आज (दि. 6 नाेव्हेंबर)ला पत्रकार परिषदेत या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवण्यात आल्याचा दावा केला असून यापुढे सिनेमामध्ये चुकीचा इतिहास दाखवला तर खपवून घेणार नाही, असे म्हटले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्यांना कठाेर शब्दात इशारा दिला आहे.

संताेष शिंदे यांनी चित्रपट निर्मात्यांवर केला आराेप
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे (Sambhaji Brigade state constituent Santosh Shinde) यांनी तीव्र आराेप करत म्हणटले की, “चित्रपट ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) दाखवणे थांबवा. सिनेमागृहात पडदे फाटल्याशिवाय थेटल मालकांची अक्कल ठिकणावर येणार नाही. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च आहेत. इतिहासाला चुकीचं दाखवून चित्रपट ‘हर हर महादेव’ तयार करण्यात आला आहे.”

संताेष शिंदे पुढे म्हणाले,“वेडात मराठे वीर दौडले सात… हा सुद्धा चित्रपट शेंबडी आणि फॉल्टी पोरांना घेऊन तयार करण्यात आलेला आहे. अकराळ विक्राळा मावळे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. इतिहासाची मोडतोड करणे थांबवा.”

संभाजी ब्रिगेडने सरकारला केली मागणी
सरकारने या चित्रफटावर बंदी घालावी असे म्हणत, संभाजी ब्रिगेडने पुढे मागणी केली की,”सुबोध भावे (Subodh Bhave), महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar), अक्षय कुमार (Akshay Kumar) किंवा अभिजीत देशपांडे (Abhijeet Deshpande) कुणीही छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj ) यांच्या कर्तुत्वान इतिहास बदनाम करू नका. असे केल्यास गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे. सिनेमागृहाचे पडदे फाडल्याशिवाय तुम्हाला अक्कल येणार नाही, असा इशारा प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी दिला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जरा इकडे पाहा! ‘हवा हवाई’वर थिरकली जान्हवी कपूर, बोनी कपूरने दिली प्रतिक्रिया

आलिया-रणबीरच्या आनंदी वातावरणात करण जोहरचा उठतोय बाजार…

हे देखील वाचा