Tuesday, March 5, 2024

‘विशू किती उत्तम आणि प्रगल्भ अभिनेत्री’ म्हणत समीर चौगुलेने विशाखासाठी शेअर केली खास पोस्ट

आज मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीची विनोदी अभिनेत्री अशी ओळख मिळवणारी विशाखा सुभेदार तिचा वाढदिवस साजरा करत आहे. विशाखाने मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने तिचे करियर उभे केले आहे. अनेक विनोदी भूमिका अगदी लीलया करणारी विशाखा आज सगळ्यांचीच लाडकी अभिनेत्री आहे. तिला तिच्या आजच्या खास दिवशी सर्वच वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच तिचा हास्य पार्टनर असणाऱ्या समीर चौगुलेने देखील विशाखाला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. 

समीरने विशाखासोबत एक फोटो पोस्ट करत तिच्यासाठी लिहिले, “वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा विशाखा सुभेदार …….विशू किती उत्तम आणि प्रगल्भ अभिनेत्री आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाहीय..विनोद आणि गंभीर अश्या सर्व गल्यांमध्ये मनसोक्त मुशाफिरी करणारी विशू शेर, गझल, कविता या प्रांतात शिरली की काहीशी हळवी होते. हास्यजत्रेत तिच्या बरोबर घातलेला धुमाकूळ हा निव्वळ आणि निखळ आनंद देणारा होता…”

 

View this post on Instagram

 

A post shared by Samir Choughule (@samirchoughule)

पुढे समीर चौगुले ने लिहिले, “एक सह कलाकार आणि मैत्रीण म्हणून आम्ही सगळेच तिला मिस करतो…आणि ती वेगळ्या वाहिनीवरील कार्यक्रमात उत्तम काम करतेय याचा आम्हाला आनंद ही आहे…”kurrrrr” नावाचं एक उत्तम मनोरंजन करणार नाटक घेऊन ती आता लवकरच अमेरिका दौऱ्या वर जातेय..विशू तुला खूप खूप शुभेच्छा …तुझ्या सर्व इच्छा ताबडतोब पूर्ण होवोत अशी ईश्वर चरणी प्रार्थना..खूप प्रेम…..”,

दरम्यान महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो करताना समीर आणि विशाखा यांची जोडी तुफान गाजली. या जोडीचा प्रत्येक ऍक्ट तुफान हिट झाला. आजही त्यांची जोडी पुन्हा बघण्याची अनेकांची इच्छा आहे. सर्वच प्रेक्षक हास्यजत्रा बघताना विशाखाला खूपच मिस करतात.

दरम्यान विशाखा सुभेदारने ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोसोबतच ‘फक्त लढ म्‍हणा’, ‘४ इडियट्स’, ‘अरे आवाज कोनाचा’, ‘ये रे ये रे पैसा’,’६६ सदाशिव’ आदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ या मालिकेत दिसत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अविनाश- विश्वजित यांचा हॉलिवूडमध्ये धुमाकूळ! ‘या’ चित्रपटासाठी संगीतबद्ध केले एक अधुनिक वेडिंग साँग

‘सीता रामम’ फेम मृणाल ठाकूरने गुढी पाडवाच्या शुभेच्छा देत शेअर केले फाेटाे, एकादा पाहाच

हे देखील वाचा