Friday, July 5, 2024

“पण छे हा तरुण ऐकतोय कसला !” जयंत सावरकरांबद्दलची ‘ती’ आठवण शेअर करताना समीर चौगुले भावुक

मराठी कलाविश्वात जयंत सावरकर यांच्या निधनानंतर एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एका महान आणि प्रतिभासंपन्न अशा अभिनेत्याच्या निधनामुळे निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरून न येणारी आहे. जयंत सावरकर हे अनेक दशकांपासून अभिनयात कार्यरत होते. त्यांचे २४ जुलै रोजी निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी च्यांचे निधन झाले. मनोरंजन विश्वात त्यांची ओळख ‘अण्णा’ अशी होती. जयंत सावरकर यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी त्यांच्या आठवणींना आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या काळाला आठवत अनेक भावुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहे. जड अंतकरणाने आपल्या लाडक्या अण्णांना निरोप देताना प्रत्येक कलाकाराचे डोळे पाणवत देखील आहे. अशातच समीर चौघुले यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत लाडक्या अण्णांना निरोप दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samir Choughule (@samirchoughule)

समीर चौगुले यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “दिग्गज रंगकर्मी नटश्रेष्ठ अण्णा सावरकर गेले…तरुणांना ही लाजवेल अशी एनर्जी असणारा सच्चा रंगकर्मी गेला….नागपूरच्या नाट्य संमेलनात आम्ही दोघे रूम पार्टनर होतो….”समीर तू बिनधास्त रात्री उशिरा पर्यंत टिव्ही बघ हं….मला झोपेचा काहीच प्रॉब्लेम नाही..मला कुठे ही झोप लागते” अस म्हणून निमिषार्धात आमच्या वयातील दरी नाहीशी करून कोणत्या ही पिढीशी जुळवून घेणारे अण्णा त्या क्षणी प्रेमात पाडून गेले….सतत दुसऱ्याचं कौतुक करण्याचा स्वभाव आणि त्यांच्या संगमरवरी कारकिर्दीचे किस्से यात पहाट कधी झाली हेच कळलं नाही…मी सतत सांगतोय “अण्णा तुम्ही झोपा..पण छे हा तरुण ऐकतोय कसला !….साधारणतः मैफल काही लोकांची असते..पण त्या रात्री मात्र रसिक फक्त “मी” होतो हे माझे भाग्य….असे हे आमचे दोस्त अण्णा…..तुमच्या सारख आयुष्यभर कलेला सावलीप्रमाणे घेऊन जगता आलं पाहिजे हो…अण्णा…आम्ही तुम्हाला खूप मिस करू…जिथे असाल तिथे मस्तच असाल..”

दरम्यान समीर यांच्या या पोस्टवर अनेक नेटकाऱ्यानी देखील त्यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत. जयंत सावरकर यांनी आजवर 100 हून अधिक मराठी नाटकांमध्ये 30 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. पु. लं. देशपांडेंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ नाटकातील त्यांची अंतू बर्वाची भूमिकाही गाजली होती.

महत्त्वाच्या बातम्या-
तमन्नाला कुणी दिला जगातला पाचवा सर्वात मोठा हिरा? आकडा वाचून तुम्हालाही येईल आकडी
One Friday Night: रवीनाच्या नवीन सिनेमाचा टीझर रिलीज, सस्पेन्स आणि थ्रिलचा भडीमार; तुम्हीही पाहाच

हे देखील वाचा