Monday, October 2, 2023

तमन्नाला कुणी दिला जगातला पाचवा सर्वात मोठा हिरा? आकडा वाचून तुम्हालाही येईल आकडी

टॉलिवूड ते बॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तमन्ना भाटिया हिच्या नावाचाही समावेश होतो. तमन्ना अलीकडेच ‘लस्ट स्टोरीज 2’ या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता विजय वर्मा झळकला होता. दोघांनीही पती-पत्नीची भूमिका साकारली होती. तसेच, अनेक इंटीमेट सीन्स दिले होते. अशातच अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या चर्चेत येण्यामागील कारण जरा वेगळे आहे.

तमन्ना भाटियाकडे आहे सर्वात खास दागिणा
खरं तर, अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannah Bhatia) हिच्याकडे जगातील सर्वात महागडा दागिणा आहे. तमन्नाकडे जगातील पाचवा सर्वात मोठा हिरा आहे. याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे, जी ऐकून प्रत्येकजण हैराण होईल. आता तिच्या चाहत्यांनाही असा प्रश्न पडेल की, तमन्नाकडे हा हिरा कसा आणि कधी आला? चला तर याविषयी जाणून घेऊयात…

उपासनाने भेट म्हणून दिलेला हिरा
साऊथ सुपरस्टार राम चरण (Ram Charan) याची पत्नी उपासना (Upasana) हिने 2019मध्ये या हिऱ्याच्या अंगठीसोबत तमन्ना भाटिया हिचा फोटो शेअर केला होता. हा फोटो आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोसोबत उपासनाने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “मिसेस प्रोड्यूसरकडून सुपर तमन्ना भाटियासाठी एक गिफ्ट. तुझी आठवण काढत आहे. लवकरच भेटूया.”

दुसरीकडे, हाच फोटो तमन्नाने शेअर करत तिला धन्यवाद दिला होता. तिने लिहिले होते की, “या बॉटल ओपनरसोबत अनेक आठवणी जोडल्या गेल्या असतील. इतक्या दीर्घ काळानंतर भेटून चांगले वाटले. तुला लवकरच भेटण्याची वाट पाहतेय. तुझी खूप आठवण येते.”

खरं तर, ‘सईरा नरसिम्हा रेड्डी’ या सिनेमातील तमन्नाची भूमिका चांगली गाजली होती. या सिनेमात तमन्नासोबत अमिताभ बच्चन, किच्चा सुदीप, अनुष्का शेट्टी, विजय सेतुपती, नयनतारा आणि निहारिका यांच्याही मुख्य भूमिका होत्या.

अंगठीची किंमत
माध्यमांतील वृत्तांनुसार, या अंगठीची किंमत 2 कोटी रुपयांहून अधिक आहे. शानदार डिझाईन, टेक्स्चर आणि सुंदरतेमुळे या हिऱ्याच्या अंगठीची किंमत 2 कोटी रुयांहून अधिक आहे.

तमन्ना रिलेशनशिपमध्ये
तमन्ना भाटियाविषयी बोलायचं झालं, तर ती रिलेशनशिपमध्ये असून खूपच खुश आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, ‘लस्ट स्टोरीज 2’ सिनेमाच्या सेटवर ती विजय वर्मा (Vijay Varma) याच्या प्रेमात पडली होती.

महत्त्वाच्या बातम्या-
One Friday Night: रवीनाच्या नवीन सिनेमाचा टीझर रिलीज, सस्पेन्स आणि थ्रिलचा भडीमार; तुम्हीही पाहाच
प्रसिद्ध अभिनेता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट, भावाने दिली हेल्थ अपडेट; चाहत्यांना म्हणाला, ‘प्रार्थना करा…’

हे देखील वाचा