Monday, April 6, 2026
Home बॉलीवूड सांवळी-मोटीसमीरा रेड्डी म्हणत चेष्टा केली जायची, बालपणीच्या आठवणींनी समीरा रेड्डी भावूक, सांगितला जुना किस्सा

सांवळी-मोटीसमीरा रेड्डी म्हणत चेष्टा केली जायची, बालपणीच्या आठवणींनी समीरा रेड्डी भावूक, सांगितला जुना किस्सा

चित्रपटसृष्टीमध्ये काम मिळवणं सोपं जरी असलं तरी ते टिकून ठेवणे आणि प्रत्येक नवीन भूमिकांसाठी टिकून आणि तयार राहणे हे खूप अवघड आहे. नवीन कलाकारांना चित्रपटसृष्टीमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकदा संघर्ष करावा लागतो परंतु तुम्ही खंबीरपणे आपला ठसा उमटवला तर तुम्ही टिकून राहता. पण आज आपण एका अशा अभिनेत्री बाबत जाणून घेऊयात जुने बॉलीवूडला राम राम ठोकला आहे. या अभिनेत्रीने नुकतेच सोशल मीडियावर एक गोष्ट शेअर केली ती म्हणजे तिच्या लहानपणीची आहे. तिच्या असणाऱ्या सावळ्या रंगावरून आणि वजनावरून तिची चेष्टा केली जात असत. तसेच तिने तिच्या लहानपणीचे फोटो सुद्धा शेअर केले आहेत.

ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलत आहोत, ती म्हणजे समीरा (sameera)रेड्डी आहे. ‘बॉडी पॉझिटिव्हिटी’ला प्रोत्साहन देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या समीराने अनेक दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, समीरा रेड्डीने आता चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला आहे आणि ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी जोडलेली आहे. तिने तिच्या लहानपणीचा एक दुःखद प्रसंग शेअर केला आहे, ज्यामुळे तिला आजही वाईट वाटते.  तिच्यात आत्मविश्वासाची कशी कमतरता होती, पण लवकरच तिला चांगल्या मनाचे महत्त्व कळले, हे स्पष्ट केले आहे. समीरा रेड्डीने तिच्या लहानपणीचे फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “लहानपणी माझ्यात अजिबात आत्मविश्वास नव्हता.

त्याच पोस्टमध्ये अभिनेत्रीने पुढे लिहिले, तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांच्या पाठीशी उभे राहा. त्यांना पाठिंबा द्या. त्यांचे ऐका. मी अजूनही माझ्याबद्दलची माझी जुनी धारणा बदलण्याचा प्रयत्न करत आहे. मला खात्री आहे की आपण सर्वच लहानपणापासून मनात रुजलेल्या गोष्टींच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

सोनाक्षी सिन्हाच्या प्रेग्नन्सी अफवांवर आई पूनम सिन्हा यांनी तोडली मौन, दिले स्पष्ट उत्तर

 

हे देखील वाचा