आई झाल्यानंतर समीरा रेड्डी झाली होती ‘या’ आजाराची शिकार, वजन झाले होते तब्ब्ल १०५ किलो

बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी (Sameera Reddy) ही बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. समीराने १९९७ मध्ये ‘और आहिस्ता’ म्युझिक अल्बममधून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये समीराने काम केले. समीराचे संपूर्ण शिक्षण मुंबईतच झाले आहे. तिला मेघना रेड्डी आणि सुषमा रेड्डी या दोन बहिणी आहेत. या दोन्ही बहिणी ग्लॅमरच्या दुनियेतही कार्यरत आहेत. समीरा मंगळवारी (१४ डिसेंबर) ४३वा वाढदिवस साजरा करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sameera Reddy (@reddysameera)

उद्योगपतीशी केले लग्न 

समीराचा १४ डिसेंबर १९७८ रोजी मुंबईत जन्म झाला. सध्या चित्रपटांपासून दूर कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. समीरा चित्रपटांमध्ये चांगले काम करत होती. याचदरम्यान तिची भेट व्यावसायिक अक्षय वर्देशी झाली. दोघांमध्ये आधी मैत्री झाली, त्यानंतर अडीच वर्षे दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. त्यानंतर २०१४ मध्ये लग्न केले. अक्षयचा बाईक्सचा व्यवसाय असून, समीरालाही बाइक्सची खूप आवड आहे. लग्नाच्या एक वर्षानंतरच २५ मे २०१५ रोजी समीरा पहिल्यांदा आई झाली. समीराने एका मुलाला जन्म दिला या मुलाचे नाव हंस आहे. यानंतर समीरा जुलै २०१९ मध्ये एका मुलीची आई झाली.

View this post on Instagram

A post shared by Sameera Reddy (@reddysameera)

लठ्ठपणाची झाली शिकार

लग्नानंतर समीराचे वजन १०५ किलो झाले होते आणि तिला एलोपेशिया अरेटा नावाच्या आजाराने ग्रासले होते. त्यामुळे तिच्या डोक्यावरचे केस गेले. नंतर ती डॉक्टरकडे गेली आणि उपचाराला सुरुवात केली. उपचारानंतर, तिने स्वत: मध्ये अनेक चांगले बदल अनुभवले. एक नवीन आणि आकर्षक व्यक्तिमत्व तिने स्वतःमध्ये अनुभवले. समीराच्या पहिल्या गरोदरपणात ज्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत त्या दुसऱ्या गर्भारपणात तिने पूर्ण केल्या. दुसऱ्या गरोदरपणात ती घाबरली होती कारण ती ४० वर्षांची होती.

View this post on Instagram

A post shared by Sameera Reddy (@reddysameera)

सोशल मीडियावर असते सक्रिय 

यानंतर समीराने पडद्यावर नाही, तर सोशल मीडियावर पुनरागमन केले. येथे ती खूप सक्रिय आहे आणि तिच्या आयुष्यातील संघर्ष आणि अनेक अनुभव शेअर करत असते. यासोबतच ती तिच्या कुटुंबाचे फोटो आणि व्हिडिओही शेअर करत असते. याशिवाय समीरा तिच्या सासूसोबत एक युट्यूब चॅनेलही चालवते. हे एक कुकिंग चॅनेल आहे. यावर ती सतत वेगवेगळ्या रेसिपींचे व्हिडिओ शेअर करत असते. लॉकडाऊन दरम्यान तिने अनेक व्हिडिओ बनवले, जे खूप व्हायरलही झाले.

समीराने तिच्या कारकिर्दीत ‘मुसाफिर’, ‘डरना मना है’, ‘प्लॅन’, ‘टॅक्सी नंबर ९२११’, ‘नक्ष’, ‘फ्लॉवर अँड फायनल’, ‘वन टू थ्री’, कालपुरुष, ‘दे दनादन’, ‘रेड अलर्ट’ आणि ‘रेड अलर्ट’ आणि ‘चक्रव्यहू’ सारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. बॉलिवूडशिवाय तिने अनेक दक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हेही वाचा :

‘गोष्ट काळाइतकीच जुनी’, म्हणणाऱ्या मिथिला पालकरचा आयकॉनिक लूक पुन्हा एकदा चर्चेत

हातावरील टॅटूमागील गोष्ट सांगत, ‘जीव माझा गुंतला’ मधील ‘मल्हार’ने केला खास फोटो शेअर

सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोग करणार एकत्र तिसरा चित्रपट, स्कॉटलंडमध्ये झाला शूटिंगला आरंभ

Latest Post