Wednesday, July 3, 2024

डिलिव्हरी नंतर समीराला झाला होता ‘हा’ आजार, सोशल मीडियाद्वारे सांगितला संपूर्ण अनुभव

समीरा रेड्डी बॉलीवूड आणि मॉडेलिंग क्षेत्रातील ओळखीचे नाव. आज समीरा तिचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. समीराने तिच्या छोट्या करियरमध्ये चांगलेच नाव कमावले. आज समीरा चित्रपटांपासून काहीशी दूर आपले मदरहूड जीवन जगत आहे. असे असले तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या सतत संपर्कात असते. तिच्या फॅनच्या प्रश्नाला उत्तर देताना तिने तिच्या डिप्रेशन बद्दल सांगितले.

समीराला तिच्या एका फॅनने सोशल मीडियावर एक प्रश्न विचारला की, तुमच्या आयुष्यातली अशी कोणती वेळ होती जेव्हा तुम्हाला अपयश आल्यामुळे सर्वात जास्त दुःख झाले? त्यावर उत्तर देताना तिने सांगितले की,” माझ्या डिलिव्हरी नंतर मी काही दिवसातच पुन्हा काम सुरु करणार असे ठरवले होते. माझी पहिली डिलिव्हरी झाल्यानंतर मी काही दिवस डिप्रेशनमध्ये होते. मला प्लेसेंटा प्रेविया नावाचा आजार झाला. त्यानंतर मी ३/४ महिने झोपून होती. त्यामुळे माझे वजन वाढायला लागले आणि १०२ किलो झाले. मी आरशात बघायला देखील घाबरत होते. इतका बदल माझ्या शरीरात झाला होता. मला कोणी बाहेर पाहिले तर माझ्या बद्दल बोलायचे. मी माझा आत्मविश्वास गमावला होता. तेव्हा मी काही थेरपी आणि होमिओपेथिक औषध सुरु केले. हे सर्व होत असतांना मी विचार केला की मी एक आई आहे त्यामुळे मला स्वतःला सावरून उभे केले. मी जवळपास एक वर्ष घरातून बाहेर पडले नाही. अनेक थेरपी आणि औषधांनी मी बरी होत असतांना मला जाणवले की एक आई, एक बायको आणि एक स्त्री म्हणून मी कसे असावे आणि मी कसे वागत आहे. ”

समीराने २००२ सालच्या ‘मैने दिल तुझको दिया’ ह्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पुढे ती, मुसाफिर, ‘नो एंट्री’, ‘प्लान’, ‘टैक्सी नंबर ९२११’दे दना दन या सिनेमातून दिसली. समीराने मागच्यावर्षी एका मुलीला जन्म दिला. सध्या ती अभिनयापासून लांब मुलांचा सांभाळ करत आहे.

हे देखील वाचा